IPO News In Marathi : क्वाड्रंट फ्युचर टेक लिमिटेडचा आयपीओ मंगळवार, ७ जानेवारीपासून गुंतवणुकीसाठी खुला झाला असून आतापर्यंत १३५ पट सबस्क्राइब करण्यात आला आहे. उद्यापर्यंत यात गुंतवणूक करता येणार आहे.
क्वाड्रंटच्या आयपीओसाठी २७५ ते २९० रुपये प्रति शेअर असा दरपट्टा निश्चित करण्यात आला आहे. क्वाड्रंट फ्युचर टेकनं सोमवारी अँकर गुंतवणूकदारांकडून १३० कोटी रुपयांहून अधिक रक्कम गोळा केली होती. २९० कोटी रुपयांचा आयपीओ पूर्णपणे नवीन शेअर्सच्या ऑफरवर आधारित आहे. यात ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट नाही. गुंतवणूकदार किमान ५० इक्विटी शेअर्ससाठी बोली लावू शकतात. त्यानंतर ५० इक्विटी शेअर्सच्या पटीत बोली लावता येईल.
आयपीओमधून मिळणाऱ्या रकमेचा वापर कंपनीच्या दीर्घकालीन भांडवलाची गरज (स्पेशालिटी केबल डिव्हिजन) भागविण्यासाठी, इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमच्या विकासासाठी भांडवली खर्चासाठी, कंपनीनं घेतलेल्या सर्व थकीत वर्किंग कॅपिटल टर्म लोनची प्रीपेमेंट किंवा परतफेड करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठी केला जाईल.
Investorgain.com नं दिलेल्या माहितीनुसार, क्वाड्रंट फ्यूचर टेक लिमिटेडचा आयपीओ ग्रे मार्केटमध्ये २१० रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे. म्हणजेच कंपनीचे शेअर्स ५०० रुपयांना लिस्ट होऊ शकतात. म्हणजेच पहिल्या दिवशी जवळपास ७३ टक्के नफा होऊ शकतो. हा मेनबोर्ड आयपीओ आहे. हे शेअर्स बीएसई (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) वर सूचीबद्ध होणार आहेत.
संबंधित बातम्या