Apple: तुमच्या स्मार्टफोनमध्ये पाणी गेल्यास अनेक वापरकर्ते तो तांदळात ठेवून घरगुती उपाय करतात. मात्र, अॅपलने आयफोन वापरकर्त्यांना असे न करण्याचा सल्ला दिला. कारण, पाण्यात पडलेला आयफोन तांदळात ठेवल्याने वापरकर्त्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे अॅपलने आयफोन वापरकर्त्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले.
अॅपलने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार , पाण्यात पडलेला आयफोन कोरडा करण्यासाठी किंवा पाणी काढून टाकण्यासाठी कनेक्टरचे तोंड खाली करून तुमच्या हाताने आयफोनला टॅप करा. तसेच फोन हवेच्या ठिकाणी ठेवा आणि त्यानंतर ३० मिनिटानंतर यूएसबी- सी किंवा लाइटनिंग कनेक्टरने चार्ज करणे सुरू करा, असे कंपनीचे म्हणणे आहे. पाण्यात पडलेला फोन पूर्णपणे कोरडा होण्यासाठी २४ तासांचा कालवधी लागू शकतो. तोपर्यंत आयफोनमध्ये लिक्विड डिटेक्शन अलर्टचा मॅसेज दिसेल.
अॅपलने पुढे सांगितले की, आयफोनने वापरकर्त्यांनी त्यांचा आयफोन ओला असताना चार्ज करू नये. आपत्कालीन परिस्थितीत तुम्हाला याची गरज भासू शकते. तुम्ही तुमचा आयफोन केबल किंवा ऍक्सेसरीसह पुन्हा कनेक्ट केल्यास लिक्विड डिटेक्शन ओव्हरराइड करण्याचा आणि आपत्कालीन परिस्थितीत तुमचा आयफोन चार्ज करण्याचा पर्याय आहे.
अॅपलचे म्हणणे आहे की, वापरकर्त्यांनी आयफोनमधून पाणी काढण्यासाठी हेअर ड्रायर किंवा कॉम्प्रेस्ड एअरसारख्या गोष्टी वापरू नयेत. कंपनीने वापरकर्त्यांना कनेक्टरमध्ये कॉटन स्वॅब किंवा पेपर टॉवेल सारख्या इतर कोणत्याही वस्तू टाकू नये, असा इशारा देखील दिला. आयफोन पाण्यात पडल्यानंतर वापरकर्त्याने जास्त काळजी करण्याची गरज नाही. आयफोन २० फूट पाण्यात ३० मिनिटे ठेवल्यास त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
अॅपल कंपनी एकाच वेळी ५ आयफोन लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आयफोन १६ सीरिजमधील आगामी स्मारफोनच्या किंमती जाणून घेऊयात.
- आयफोन १६ एसई (१२८ जीबी स्टोरेज) संभाव्य किंमत- ५८ हजार
- आयफोन १६ एसई (२५६ जीबी स्टोरेज) संभाव्य किंमत- ६१ हजार
- आयफोन १६ प्लस एसई (२५६ जीबी स्टोरेज) संभाव्य किंमत- ६६ हजार ३०० रुपये
- आयफोन १६ प्रो (२५६ जीबी स्टोरेज) संभाव्य किंमत- ८१ हजार ९०० रुपये
- आयफोन १६ प्रो मॅक्स (२५६ जीबी स्टोरेज) संभाव्य किंमत- ९१ हजार २०० रुपये