मराठी बातम्या  /  business  /  Purandar Highlands : ३०० शेतकऱ्यांचं नशीब बदलणारा हा अवलिया कोण ? ५००० रुपयांपासून सुरु झालेला व्यवसाय आज २ कोटींपार
Purandar Highlands team with Rohan Ursal HT
Purandar Highlands team with Rohan Ursal HT

Purandar Highlands : ३०० शेतकऱ्यांचं नशीब बदलणारा हा अवलिया कोण ? ५००० रुपयांपासून सुरु झालेला व्यवसाय आज २ कोटींपार

25 May 2023, 20:04 ISTKulkarni Rutuja Sudeep

Purandar Highlands: पुणे जिल्ह्यातील पुरंदरला अंजीरासाठी जीआय टॅग (GIsPurandar Highlands) मिळाला आहे. पुरंदर हायलँड्स एफपीओ नावाची कंपनी पुरंदरचे अंजीर जगभर पोहोचवण्यात गुंतलेली आहे.

Purandar Highlands : पुण्यात राहणारा रोहन सतीश उरसाल एमबीएच्या शिक्षणादरम्यान २०१४ मध्ये एका खाद्य प्रदर्शनाला गेला होता. फ्रूट लॉजिस्टिक्सवर आधारित ही परिषद बर्लिनमध्ये होती. तेथे त्याने नाशवंत फळेही जगाच्या या कानाकोपऱ्यातून त्या कानाकोपऱ्यात पोहोचतात, हे त्याने तिथे पाहिले. त्यातील वापरण्यात आलेले तंत्रज्ञान त्याला विशेष भावले होते

ट्रेंडिंग न्यूज

यानंतर रोहन सतीश भारतात परतला. पुरंदरमधील शेतकरी आणि त्याच्या गावातील काही लोकांशी संवाद साधला. सर्वांचे सहकार्य मिळाल्यानंतर त्यांनी पुरंदर हायलँड्स फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली. त्याने ३०० हून अधिक शेतकर्‍यांसह काम सुरू केले. अलीकडे पुरंदर हाईलँड्समध्येही साखरेशिवाय ताज्या अंजीराच्या रसाची विक्री सुरू झाली आहे. कंपनी याला भारतातील 'पहिला रेडी-टू-ड्रिंक अंजीर ज्यूस' म्हणत आहे.

अलीकडेच पुरंदर हाईलँड्सने भारतातील पहिला रेडी टू ड्रिंक अंजीराचा रस लाँच केला आहे. विशेष म्हणजे पुण्याच्या पुरंदर अंजीरला जीआय टॅग मिळाला आहे. पुरंदर हाईलँड्स महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून जगातील अनेक देशांना ताजी फळे पुरवण्यात सक्रिय आहे. अल्पावधीत पुरंदर हायलँड्स एफपीओची उलाढाल दोन कोटींच्या पुढे गेली आहे.

पुण्यातील ताजे अंजीर हाँगकाँग, जर्मनी, अमेरिका आणि मध्यपूर्वेसह जगातील अनेक देशांमध्ये जात आहेत. पुरंदर हायलँड्सचे अध्यक्ष रोहन सतीश उरसाल यांनी सांगितले की, पुरंदरचे प्रसिद्ध अंजीर जगातील अनेक देशांमध्ये पाठवले जातात आणि तेथील लोकांना ते खूप आवडतात. रोहनच्या एफपीओमध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांनी आपला सर्व माल या एफपीओला विकणे बंधनकारक नाही.

अंजीरला मिळाला जीआय (GIs) टॅग

रोहन पुढे म्हणाला की, पुरंदरहून पाठवलेले हे अंजीर अपेक्षेपेक्षा जास्त काळ ताजे राहतात. पूर्वी तुर्कस्तान, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशात हाँगकाँग आणि मध्यपूर्वेतील अंजीर येत असत, परंतु आता भारतातून जीआय टॅग केलेले पुरंदरमधील हे अंजीरही या देशांमध्ये पाठवले जात आहेत.

अंजीराची चव आणि पोत

पुरंदरमध्ये पिकवल्या जाणाऱ्या अंजीरांची चव, आणि पोत वेगळी असते. साधारणपणे अंजीर हे अतिशय नाशवंत फळ आहे, परंतु पुरंदरच्या डोंगराळ भागातून ते जगाच्या पटलावर पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न यशस्वी ठरत आहे.

५००० रुपयांपासून सुरुवात

पुरंदर हाईलँड्स FPO मध्ये १३ गुंतवणूकदारांनी ५००० रुपयांची प्रारंभिक गुंतवणूक केली होती. त्यानंतर कोणत्याही गुंतवणूकदाराकडून निधी घेण्यात आलेला नाही. २०२२ मध्ये भारतातून अंजीरची पहिली पेटी जर्मनीला पाठवण्यात आली होती, ज्याचे देशाचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी खूप कौतुक केले होते.

विभाग