PNB share price : दणदणीत तिमाही निकालानंतर पंजाब नॅशनल बँकेचा शेअर उसळला! आता काय करायचं?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PNB share price : दणदणीत तिमाही निकालानंतर पंजाब नॅशनल बँकेचा शेअर उसळला! आता काय करायचं?

PNB share price : दणदणीत तिमाही निकालानंतर पंजाब नॅशनल बँकेचा शेअर उसळला! आता काय करायचं?

Jul 29, 2024 02:56 PM IST

PNB Share price : पंजाब नॅशनल बँकेच्या पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर बँकेच्या शेअरच्या किंमतीत ७ टक्के अधिक वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत हा शेअर ठेवायचा, काढायचा की नव्यानं खरेदी करायची असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे.

PNB share price : दणदणीत तिमाही निकालानंतर पंजाब नॅशनल बँकेचा शेअर उसळला! आता काय करायचं?
PNB share price : दणदणीत तिमाही निकालानंतर पंजाब नॅशनल बँकेचा शेअर उसळला! आता काय करायचं?

stock market news : पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) पहिल्या तिमाहीच्या दणदणीत निकालाचा थेट परिणाम बँकेच्या शेअरवर झाला. तिमाही निकालाच्या पार्श्वभूमीवर आज बँकेचा शेअर तब्बल ७ टक्क्यांनी उसळला. बँकेच्या शेअरचा भाव आज १२४.५० रुपयांवर खुला झाला आणि १२७.४० वर पोहोचला.

पंजाब नॅशनल बँकेला आतापर्यंतचा सर्वाधिक ३,२५२ कोटी रुपयांचा तिमाही नफा झाला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यात १५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मिळणारं व्याज आणि भरलेलं व्याज अर्थात, निव्वळ व्याज उत्पन्न (NII) यातील तफावत १०.२ टक्क्यांनी वाढून १०,४७६.२ कोटी रुपये झाली आहे.

पीएनबीच्या शेअरची वाटचाल

मागच्या वर्षभरापासून पंजाब नॅशनल बँकेचा शेअर सुस्साट सुटला आहे. या कालावधीत शेअरमध्ये तब्बल १०६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जानेवारी २०२४ पासून हा शेअर ३० टक्क्यांनी वाढला आहे. मागच्या महिन्यातील वाढ तुलनेनं कमी म्हणजे ४ टक्के आहे. तिमाही निकालानंतर पुन्हा शेअर वेग घेण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञ काय म्हणतात…

जेफरीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या विश्लेषकांनी पीएनबीच्या शेअरची लक्ष्य किंमत १५० रुपये ठेवली आहे. निकालानंतर शेअरमध्ये २० टक्के वाढीचा अंदाज वर्तवला आहे. आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या तिमाहीत पंजाब नॅशनल बँकेचा निव्वळ नफा जास्तीच्या ऑपरेटिंग खर्चामुळे (प्रायॉरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट) जेफरीजच्या अंदाजापेक्षा थोडा कमी असला तरी भविष्यात तो वाढेल अशी अपेक्षा आहे.

मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने पहिल्या तिमाहीच्या निकालानंतर आर्थिक वर्ष २०२५ आणि २०२६ साठी अनुक्रमे ५.६ टक्के आणि ०.८ टक्के प्रति शेअर उत्पन्न वाढीचा अंदाज व्यक्त केला आहे. आर्थिक वर्ष २०२६ मध्ये आरओए (रिटर्न ऑन अ‍ॅसेट) आणि आरओई (रिटर्न ऑन इक्विटी) अनुक्रमे १.० टक्के आणि १४.५ टक्के राहण्याचा अंदाज आहे. मोतीलाल ओसवालनं पंजाब नॅशनल बँकेच्या शेअरची टार्गेट प्राइस १३५ रुपये निश्चित केली आहे.

कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजनं पंजाब नॅशनल बँकेच्या निकालानंतरच्या अहवालात बँकेबाबत सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. बँकेचं निव्वळ एनपीएल (नॉन परफॉर्मिंग लोन) गुणोत्तर ०.६ टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. स्लिपेज रेशो ०.८ टक्के होता. बुडीत कर्जाची वसुली चांगली झाली. सकारात्मक बाब म्हणजे रिटेल आणि कृषी क्षेत्राच्या नेतृत्वात अ‍ॅडव्हान्समध्ये दरवर्षी १२ टक्के वाढ झाली. मात्र, बँकेचा शेअर सध्या खूपच महाग आहे. त्याची खरी टार्गेट प्राइस ११० रुपये आहे, असं कोटक इक्विटीजनं म्हटलं आहे.

 

(डिस्क्लेमर: वरील मतं आणि शिफारशी विश्लेषकांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी त्याच्याशी सहमत असेलच असं नाही. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं गुंतवणुकीचा कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी चर्चा करावी.)

Whats_app_banner