एका रात्रीचे भाडे ९० हजार असलेल्या टॉप रिसॉर्टमध्ये पुण्यातील महिला फुकटात राहिली! तेही ३ दिवस! काय शक्कल लढवली?
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एका रात्रीचे भाडे ९० हजार असलेल्या टॉप रिसॉर्टमध्ये पुण्यातील महिला फुकटात राहिली! तेही ३ दिवस! काय शक्कल लढवली?

एका रात्रीचे भाडे ९० हजार असलेल्या टॉप रिसॉर्टमध्ये पुण्यातील महिला फुकटात राहिली! तेही ३ दिवस! काय शक्कल लढवली?

Oct 22, 2024 05:27 PM IST

पुण्यातील एका महिलेने एकही रुपया खर्च न करता भारतातील टॉप रिसॉर्ट मॅरियट रिसॉर्टमध्ये तीन दिवस राहिली. एका रात्रीचे ९० हजार भाडे असलेल्या रिसॉर्टमध्ये ही महिला फुकटात कशी राहिली, हे जाणून घेऊयात.

पुण्यातील महिला मॅरियट रिसॉर्टमध्ये तीन फुकटात कशी राहिली? वाचा
पुण्यातील महिला मॅरियट रिसॉर्टमध्ये तीन फुकटात कशी राहिली? वाचा (X/mepritijain)

सोशल मीडियावर दररोज नवीन पोस्ट व्हायरल होत असतात, ज्यांना हजारो लोक पसंत करतात. अशीच एक पोस्ट ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी हिमालयात गेलेल्या एका महिलेने आपला अनुभव शेअर केला आहे. संबंधित महिला भारतातील टॉपचे रिसॉर्ट असलेले लक्झरी मॅरियट रिसॉर्टमध्ये तीन दिवस राहिली, जिथे फक्त एका रात्रीचे भाडे ९० हजार रुपये आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या महिलेने एकही रुपया खर्च न करता या रिसॉर्टमध्ये सुट्टीचा आनंद घेतला आहे. हे ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या महिलेने 

प्रीती जैन असे संबंधित महिलेने नाव आहे. चार्टर्ड अकाऊंटंट असलेली प्रीती पुण्यातील रहिवाशी आहे. प्रीती जैन हिने आपल्या ट्विटर केलेल्या एका पोस्टमध्ये असे म्हटले आहे की,  'ती हिमालयातील मॅरियट रिसॉर्टमधील एका खोलीत तीन दिवस राहिली, जिथे एका रात्रीचे भाडे ९० हजार रुपये होते, ज्यात कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टचा समावेश होता. आम्हाला पहिल्या दिवशी प्रीमियर रूममध्ये त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी दुसरीकडे शिफ्ट करण्यात आले, जे खूप भारी होते. हे हॉटेल हिमालयाच्या पायथ्याशी असल्यामुळे विलोभनीय नजारा पाहायला मिळाला.' प्रीती ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.

प्रीती जैन हिने आपल्या अमेरिकन एक्सप्रेस प्लॅटिनम कार्डच्या मेंबरशिप रिवॉर्ड पॉईंट्समुळे आपला खर्च कमी केेला. मुक्कामादरम्यान मॅरियट रिसॉर्टने तिला आणि तिच्या पतीला मोफत नाश्ता आणि उच्च-चहा दिला. नदीला लागून असलेल्या डेकवर अप्रतिम दृश्य पाहिले. तिच्या हिशोबानुसार, सुइट अपग्रेड आणि कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्टसह, तिच्या मुक्कामाची एकूण किंमत सुमारे ३ लाखापर्यंत जाज रुपये झाली, ज्याचे वर्णन तिने 'अविश्वसनीय डील' म्हणून केले.

‘लाइव्ह म्युझिक, उत्तम जेवण आणि पाहुण्यांसाठी एकंदरीत आरामदायक अनुभव होता,’ ती म्हणाली, रिसॉर्टने तिच्या पतीच्या वाढदिवसासाठी एक खास निग्रोनी केक देखील तयार केला आणि त्यांच्या मुक्कामाच्या प्रत्येक दिवशी त्यांची खोली सजवली. पुढच्या वेळी जेव्हा कोणी क्रेडिट कार्ड निरुपयोगी किंवा वाईट असल्याचे जाहीर करेल. तेव्हा त्याला ही गोष्ट नक्की सांगा. 

Whats_app_banner