PSU Share News Today : सरकारी कंपनी आयटीआयच्या शेअर्समध्ये आज जवळपास १० टक्क्यांपर्यंत वाढ पाहायला मिळाली. कंपनीचा शेअर ३८३.९५ रुपयांवर खुला झाला. दिवसभरात तो जवळपास १० टक्क्यांनी वधारून ४०४ रुपयांवर पोहोचला. दिवसाअखेर त्यात काहीशी घसरण होऊन तो ३८३.५० रुपयांवर बंद झाला. शेअरमधील तेजीचा हा सलग तिसरा दिवस आहे.
आयटीआय लिमिटेडच्या शेअरमध्ये काल १५ टक्के आणि त्याच्या आधीच्या व्यवहाराच्या दिवशी १३ टक्क्यांची वाढ दिसून आली. म्हणजेच अवघ्या ३ दिवसात शेअरमध्ये ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२५ ऑक्टोबर रोजी हा शेअर ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर २१० रुपयांवर पोहोचला होता. आज कंपनीचा शेअर ४०४ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. अवघ्या २ दिवसात कंपनीच्या शेअर्सच्या किंमतीत ९२ टक्क्यांची वाढ झाली आहे.
डिसेंबर महिन्यात आयटीआयच्या शेअर्समध्ये ३८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, नोव्हेंबरमध्ये हा शेअर २७ टक्क्यांनी वधारला. त्याआधी सलग ३ महिने कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली होती. कंपनीच्या शेअर्समध्ये ६ महिन्यांत ३४ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर शेअरच्या किंमतीत ३ वर्षात २३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
बीएसईच्या आकडेवारीनुसार कंपनीनं २००१ मध्ये लाभांश दिला होता. त्यानंतर कंपनीनं ०.५० रुपयांचा लाभांश दिला. ट्रेंडलिनच्या आकडेवारीनुसार या कंपनीत सरकारचा ९० टक्के हिस्सा आहे. कंपनीचं मार्केट कॅप ३६,८५० कोटी रुपये आहे.
संबंधित बातम्या