मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Dividend News : सरकारी कंपनीनं जाहीर केला भरघोस डिविडंड; तुम्हालाही मिळू शकतो लाभ! कसा? वाचा!

Dividend News : सरकारी कंपनीनं जाहीर केला भरघोस डिविडंड; तुम्हालाही मिळू शकतो लाभ! कसा? वाचा!

Jul 02, 2024 11:43 AM IST

Indian Oil corporation dividend : शेअर बाजारात सध्या उत्साहाचं वातावरण आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी वधारत असल्यानं पोर्टफोलिओ हिरवेगार झाले आहेत. अशातच इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर केला आहे.

सरकारी कंपनीनं जाहीर केला भरघोस डिविडंड; तुम्हालाही मिळू शकतो लाभ! कसा? वाचा!
सरकारी कंपनीनं जाहीर केला भरघोस डिविडंड; तुम्हालाही मिळू शकतो लाभ! कसा? वाचा!

Indian Oil corporation dividend : सार्वजनिक क्षेत्रातील एक महत्त्वाची तेल कंपनी असलेल्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं गुंतवणूकदारांना खूषखबर दिली आहे. कंपनीनं गुंतवणूकदारांसाठी लाभांश जाहीर केला आहे. त्यानुसार, एका शेअरवर ७ रुपये दिले जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

कंपनीनं या लाभांशासाठी १२ जुलै २०२४ ही 'रेकॉर्ड डेट' निश्चित केली आहे. याचा अर्थ, या तारखेला ज्या गुंतवणूकदारांची नावं कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये असतील त्यांनाच लाभांशाचा लाभ मिळेल. मागच्या काही वर्षांत कंपनीनं दिलेल्या लाभांशाच्या तुलनेत हा सर्वाधिक लाभांश आहे. नवीन गुंतवणुकीचा विचार करणाऱ्यांसाठी ही चांगली संधी आहे.

गेल्या १५ वर्षांत काही मोजक्या कंपन्यांनी गुंतवणूकदारांना चार वेळा बोनस शेअर्स दिले आहेत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही त्या मोजक्या कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी गुंतवणूकदारांना वेळोवेळी काही ना काही फायदा मिळवून देत असते. कंपनीच्या शेअरचे भाव खाली-वर होत असल्यानं त्यातूनही कमाईची संधी गुंतवणूकदारांना मिळते.

२०२२ मध्ये आयओसीनं दिले होते बोनस शेअर्स

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडनं शेवटचे बोनस शेअर्स २०२२ मध्ये दिले होते. तेव्हा कंपनीने २ शेअर्सवर १ शेअर बोनस दिला होता. या कंपनीनं २००९ मध्ये पहिल्यांदा, २०१६ मध्ये दुसऱ्यांदा आणि २०१८ मध्ये तिसऱ्यांदा बोनस शेअर्स दिले होते. या तीन वेळा प्रत्येक शेअरवर एक शेअर बोनस देण्यात आला.

शेअर बाजारात कंपनीची कामगिरी कशी आहे?

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या शेअर्सची किंमत सध्या २०० रुपयांपेक्षा कमी आहे. सोमवारी बाजार बंद झाला तेव्हा कंपनीचे शेअर्स बीएसईवर १,२७ टक्क्यांनी वाढून १६७.७० रुपयांवर होते. गेल्या ६ महिन्यांबद्दल बोलायचं झाल्यास, कंपनीच्या शेअर्सची किंमत २८.७० टक्क्यांनी वाढली आहे. तर, ज्या लोकांनी एक वर्षासाठी स्टॉक ठेवला आहे, त्यांना ८३ टक्के इतका जबरदस्त परतावा मिळाला आहे. 

कंपनीच्या शेअरच्या किंमतीची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी ८५.५१ रुपये आहे आणि ५२ आठवड्यांची उचांकी पातळी १९६.८० रुपये आहे. कंपनीचे मार्केट कॅप २,३६,८१३.१७ कोटी आहे. या कंपनीत सरकारचा हिस्सा ५१.५० टक्के आहे.

 

(डिस्क्लेमर : हे वृत्त शेअर बाजार व विशिष्ट कंपनीतील घडामोडींची केवळ माहिती देणारं आहे. हा कोणत्याही प्रकारचा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणुकीत जोखीम असते. त्यामुळं कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

WhatsApp channel
विभाग