Stock Market Marathi News : प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेड पुन्हा एकदा एक्स-डिव्हिडंड देणार आहे. कंपनी यावेळी एका शेअरवर ६० रुपये लाभांश देणार आहे. कंपनी या महिन्यात एक्स-डिव्हिडंड स्टॉक म्हणून व्यवहार करेल. गुरुवारी बीएसईमध्ये बाजार बंद होताना कंपनीचा शेअर १.४१ टक्क्यांनी घसरल्यानंतर ५१४३.९५ रुपयांच्या पातळीवर होता.
कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, पात्र गुंतवणूकदारांना प्रति शेअर ६० रुपये लाभांश देण्यात येणार आहे. त्यासाठी २८ नोव्हेंबर २०२४ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. म्हणजेच ज्या गुंतवणूकदारांचे नाव या दिवशी कंपनीच्या रेकॉर्ड बुकमध्ये राहील, त्यांना लाभांशाचा लाभ मिळणार आहे.
या वर्षी आतापर्यंत कंपनीनं २०० रुपयांचा लाभांश दिला आहे. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी कंपनीनं १५० रुपयांचा विशेष लाभांश आणि ५० रुपये प्रति शेअर अंतरिम लाभांश दिला. कंपनीनं २९ मे २००१ रोजी पहिल्यांदा डिविडंड जाहीर केला होता. त्यावेळी कंपनीनं प्रति शेअर ३.५ रुपये लाभांश दिला.
गेल्या आठवडाभरात प्रॉक्टर अँड गॅम्बल हेल्थ लिमिटेडच्या शेअरमध्ये जवळपास १० टक्क्यांची घसरण झाली आहे. तर शेअरच्या किंमतीत महिन्याभरात १.४८ टक्क्यांची घसरण झाली आहे. वर्षभरात हा डिव्हिडंड शेअर केवळ ०.६१ टक्के परतावा देऊ शकला आहे. कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५८३५.९५ रुपये आणि कंपनीचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर ४६४०.३० रुपये आहे. बीएसईमध्ये कंपनीचे मार्केट कॅप ८५३८.६४ कोटी रुपये आहे.