अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरची मार्केटमध्ये पुन्हा हवा! कंपनीच्या शेअरकडून तज्ज्ञांना मोठ्या अपेक्षा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरची मार्केटमध्ये पुन्हा हवा! कंपनीच्या शेअरकडून तज्ज्ञांना मोठ्या अपेक्षा

अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरची मार्केटमध्ये पुन्हा हवा! कंपनीच्या शेअरकडून तज्ज्ञांना मोठ्या अपेक्षा

HT Marathi Desk HT Marathi
Published Oct 30, 2024 06:38 PM IST

Reliance Power Share Price : अनिल अंबानी यांच्या रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या काही सत्रांपासून ८० टक्के वाढ झाली आहे. विश्लेषकांच्या मते, येत्या काही दिवसांत हा शेअर ५८-६२ रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

यूपीत वीज क्षेत्राला मिळू शकते १५ हजार कोटी
यूपीत वीज क्षेत्राला मिळू शकते १५ हजार कोटी

Reliance Power share price : गेली अनेक वर्षे गुंतवणूकदारांना रडवणारा अनिल अंबानी यांच्या मालकीच्या रिलायन्स पॉवरचा शेअर मागच्या काही दिवसांपासून पुन्हा बाळसं धरू लागला आहे. बुधवारी कंपनीचा शेअर ३ टक्क्यांहून अधिक वधारून ४२.७४ रुपयांवर पोहोचला. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये ८० टक्के आणि वर्षभरात १५० टक्के वाढ झाली आहे. 

अलीकडंच कंपनीनं कर्जमुक्त होत असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडनेही (VIPL) गॅरंटर म्हणून कर्जाची परतफेड करण्याची घोषणा केली आहे.

एक्सपर्ट्सना विश्वास

रिलायन्स पॉवरच्या शेअरबद्दल एक्सपर्ट्स आशावादी दिसत आहेत. शेअर्सबाबत चॉइस ब्रोकिंगचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुमीत बगाडिया म्हणाले, ‘गेल्या काही महिन्यांत या शेअरने सातत्याने वरची आणि खालची पातळी कायम ठेवली आहे. येत्या काही दिवसांत कंपनीचे शेअर्स ५८ ते ६२ रुपयांपर्यंत व्यवहार करू शकतात.’

एलआयसीकडे १० कोटींहून जास्त शेअर

रिलायन्स पॉवरच्या शेअरनं चार वर्षांत ४००० टक्के दमदार परतावा दिला आहे. २७ मार्च २०२० रोजी शेअरची किंमत १.१५ रुपये होती. मात्र, दीर्घ मुदतीत या शेअरनं २७४ रुपयांचा (२३ मे २००८ रोजी बंद भाव) मोठा तोटा केला. म्हणजेच २००८ ते २०२० या काळात या शेअरमध्ये ९९ टक्के घसरण झाली होती. रिलायन्स पॉवरच्या शेअर्सनं गेल्या पाच वर्षांत १२०० टक्के परतावा दिला आहे. या दरम्यान त्याची किंमत २.४५ रुपयांवरून सध्याच्या किमतीपर्यंत वाढली. कंपनीच्या शेअरमध्ये एलआयसीचा मोठा वाटा आहे. एलआयसीकडे रिलायन्स पॉवरचे १०,२६,५९,३०४ शेअर्स आहेत.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हा कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner