Stock Market : अनिल अंबानींच्या कर्जमुक्त कंपनीच्या शेअरची कमाल; ५ वर्षांत मिळवून दिला ३४०० टक्क्यांचा नफा
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Stock Market : अनिल अंबानींच्या कर्जमुक्त कंपनीच्या शेअरची कमाल; ५ वर्षांत मिळवून दिला ३४०० टक्क्यांचा नफा

Stock Market : अनिल अंबानींच्या कर्जमुक्त कंपनीच्या शेअरची कमाल; ५ वर्षांत मिळवून दिला ३४०० टक्क्यांचा नफा

Feb 04, 2025 05:29 PM IST

Reliance Power Share Price : रिलायन्स पॉवरच्या शेअर्सने मंगळवारी ५ टक्क्यांची वाढ दर्शवली, ज्यामुळे शेअर 39.91 रुपये वर बंद झाला. कंपनीच्या शेअर्समध्ये 5 वर्षांत 3400% वाढ झाली आहे, यामुळे मार्केट कॅप 16,000 कोटींच्या पुढे गेला.

Stock Market : अनिल अंबानींच्या कर्जमुक्त कंपनीच्या शेअरची धम्माल; ५ वर्षांत ३४०० टक्क्यांचा नफा
Stock Market : अनिल अंबानींच्या कर्जमुक्त कंपनीच्या शेअरची धम्माल; ५ वर्षांत ३४०० टक्क्यांचा नफा

Anil Ambani Company Share : अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी आली आहे. हा शेअर मंगळवारी ५ टक्क्यांनी वधारून ३९.९१ रुपयांवर बंद झाला. रिलायन्स पॉवरचे शेअर्स ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ३४०० टक्क्यांपेक्षा जास्त वधारले आहेत. म्हणजेच या कालावधीत गुंतवणूकदारांना छप्परफाड नफा झाला आहे.

रिलायन्स पॉवरचा शेअर मागील पाच वर्षांच्या काळात १.१३ रुपयांवरून ४० रुपयांवर पोहोचला आहे. रिलायन्स पॉवरचा शेअर २७ मार्च २०२० रोजी १.१३ रुपयांवर व्यवहार करत होता. त्यानंतरच्या कालावधीत त्यात ३४०० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. आज हा शेअर ३९.९१ रुपयांवर बंद झाला. 

कंपनीच्या शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ५४.२५ रुपये आहे. तर, कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १९.३७ रुपये आहे. रिलायन्स पॉवरचं मार्केट कॅप १६ हजार कोटी रुपयांच्या पुढं गेलं आहे. 

गेल्या ४ वर्षात अनिल अंबानी यांच्या कंपनीच्या शेअर्समध्ये ११०२ टक्के वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स ३.३२ रुपयांवरून ३९ रुपयांवर गेले आहेत. रिलायन्स पॉवर स्वतंत्र तत्त्वावर कर्जमुक्त झाली आहे.

संयमी गुंतवणूकदारांना मोठा फायदा

रिलायन्स पॉवरच्या शेअरमध्ये गेल्या दोन वर्षांत २३९ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३ फेब्रुवारी २०२३ रोजी वीज कंपनीचा शेअर ११.७५ रुपयांवर होता, आज तो ३९.९१ रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात अनिल अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये ४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या काळात कंपनीचे शेअर्स २७.३६ रुपयांवरून ४० रुपयांच्या जवळपास पोहोचले आहेत. गेल्या सहा महिन्यांत रिलायन्स पॉवरचे शेअर्स जवळपास २२ टक्क्यांनी वधारले आहेत. मात्र, चालू कॅलेंडर वर्षात आतापर्यंत कंपनीचा शेअर जवळपास ११ टक्क्यांनी घसरला आहे.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner