मराठी बातम्या  /  business  /  Post office PPF schemes : वयाच्या २० व्या वर्षापासून १ लाख रुपये गुंतवा, ४० व्या वर्षी लखपती व्हा!
PPF HT
PPF HT

Post office PPF schemes : वयाच्या २० व्या वर्षापासून १ लाख रुपये गुंतवा, ४० व्या वर्षी लखपती व्हा!

17 March 2023, 10:35 ISTKulkarni Rutuja Sudeep

Post Office PPF Scheme : पीपीएफ योजनेतील गुंतवणूक पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेद्वारे सुरू केली जाऊ शकते. तुम्ही एका आर्थिक वर्षात योजनेत किमान ५०० रुपये जमा करू शकता. तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतील.

Post Office PPF Scheme : तुमचे वय २० वर्षे असेल आणि तुम्हाला वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत तुमच्या खात्यात ४० लाख रुपये जमा करायचे असतील, तर पोस्ट ऑफिसची पीपीएफ योजना फायदेशीर ठरू शकते. कारण त्यातून सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा मिळू शकतो. त्याशिवाय या योजनेत जोखीम कमी आणि अधिक नफा मिळू शकतो. विशेष बाब म्हणजे या योजनेत करसवलत मिळते, त्यासोबतच या योजनेवर मिळणारे व्याजही दर तिमाहीत बदलले जातात.

ट्रेंडिंग न्यूज

असे आहे पोस्ट ऑफिस पीपीएफ योजनेचे गणित

प्रति वर्ष गुंतवणूक: १ लाख रुपये

कार्यकाळ: २० वर्षे

व्याज दर: ७.१%

गुंतवलेली एकूण रक्कम: २० लाख रुपये

एकूण व्याज मिळाले: २४,३८,८५९ रुपये.

मॅच्युरिटी रक्कम: ४४,३८,८५९ रुपये

पोस्ट ऑफिसमधील पीपीएफबद्दल माहिती

पीपीएफ योजनेतील गुंतवणूक पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेतून सुरू करता येते. तुम्ही एका आर्थिक वर्षात योजनेत किमान ५०० रुपयांपासून गुंतवणूक सुरु करता येते. तर जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येते. गुंतवणूदाराला कलम ८० सी अंतर्गत गुंतवणुकीच्या रकमेवरही कर कपात उपलब्ध आहे.

प्री विड्राॅवल्ससाठी लाॅक इन कालावधी

प्री-विड्रॉवलसाठी, पीपीएफ खात्यातील लॉक-इन कालावधी ५ वर्षांसाठी ठेवण्यात आला आहे. म्हणजे खाते उघडल्याच्या वर्षानंतर ५ वर्षांपर्यंत या खात्यातून पैसे काढता येणार नाहीत. हा कालावधी पूर्ण झाल्यानंतर, फॉर्म २ भरून प्री-विड्रॉवल करता येईल. तथापि, १५ वर्षापूर्वी मॅच्युरिटीच्या आधी रक्कम काढता येत नाही.

विभाग