Share Market: 'या' कंपनीच्या शेअरचा बाजारात धुमाकूळ, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; खरेदीसाठी लूट!-positron energy shares list at 90 premium on nse sme platform ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Share Market: 'या' कंपनीच्या शेअरचा बाजारात धुमाकूळ, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; खरेदीसाठी लूट!

Share Market: 'या' कंपनीच्या शेअरचा बाजारात धुमाकूळ, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट; खरेदीसाठी लूट!

Aug 20, 2024 05:04 PM IST

Positron Energy: पॉझिट्रॉन एनर्जीच्या शेअरच्या भावाने आज एनएसई एसएमईवर चांगली सुरुवात केली.

पॉझिट्रॉन एनर्जीच्या शेअरच्या किंमतीत झपाट्याने वाढ
पॉझिट्रॉन एनर्जीच्या शेअरच्या किंमतीत झपाट्याने वाढ

Positron Energy Share Price: पॉझिट्रॉन एनर्जी आयपीओने शेअर बाजारात दणक्यात एन्ट्री केली. कंपनीच्या शेअर्सने पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला. पॉजिट्रॉन एनर्जी ८ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट २०२४ या कालावधीत खुला होता. शेअर्सची किंमत २३८ रुपये ते २५० रुपये प्रति शेअर दरम्यान निश्चित करण्यात आली. या आयपीओला गुंतवणूकदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

हा आयपीओ ४१५ पटींपेक्षा अधिक वेळा सब्सक्राइब करण्यात आला. एनआयबीने ८०५.८४ पटीने आणि किरकोळ गुंतवणूकरांनासाठी ३५१ पटीने सब्सक्राइब करण्यात आला. कंपनीने आयपीओद्वारे बाजारातून ५१.२१ कोटी रुपये उभारले. कंपनीच्या आयपीओचा एक लॉट ६०० शेअर्सचा होता. गुंतवणूकदार किमान एक लॉटसाठी खरेदी करू शकतात. गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान एक लाख ५० हजार रुपये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. कंपनीने आयपीओ उघण्यापूर्वी १४.५८ कोटी उभारले. आयपीओमध्ये शेअर्सचे दर्शनी मूल्य १० रुपये निश्चित करण्यात आले.

काय म्हणाली कंपनी?

नव्या इश्यूमधून जमा होणारा निधी प्रामुख्याने वर्किंग कॅपिटलच्या गरजा भागविण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. आयपीओने ९ ऑगस्ट रोजी अँकर गुंतवणूकदारांकडून १४.६ कोटी रुपये गोळा केले होते. बीलाइन कॅपिटल अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडने आयपीओसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून काम पाहिले. तर, लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने रजिस्ट्रार म्हणून काम पाहिले. २००८ मध्ये स्थापन झालेली पॉझिट्रॉन एनर्जी भारतातील तेल आणि वायू उद्योगाला व्यवस्थापन आणि तांत्रिक सल्लागार सेवा पुरवते.

सनलाइट रिसायकलिंग इंडस्ट्रीजच्या आयपीओ धमाका

सनलाइट रिसायकलिंग इंडस्ट्रीजच्या आयपीओला धमाकेदार लिस्टिंग मिळाले आहे. एनएसई एलएमईवर कंपनीची लिस्टिंग आज ९० टक्के प्रीमियमसह १९९ रुपयांवर आहे. आयपीओसाठी प्राइस बँड १०५ रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. ग्रे मार्केटमधून मजबूत लिस्टिंगची चिन्हे सातत्याने दिसत होती. धमाकेदार लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये अपर सर्किट आहे. पहिल्या दिवशी डबल लिस्टिंगनंतर शेअर्सने ५ टक्क्यांचा वरचा टप्पा गाठला. त्यानंतर एनएसई एसएमईमध्ये शेअरचा भाव २०९.४५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. लिस्टिंगनंतर अपर सर्किटमुळे आयपीओच्या वेळीज्या गुंतवणूकदारांना शेअर्सचे वाटप झाले असते त्यांचे पैसे दुप्पट झाले आहेत.

 

विभाग