POCO X7 5G Price and Specifitions: झी चिनी टेक ब्रँड पोकोचा लेटेस्ट पोको एक्स ७ सीरिज आजपासून भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. या सीरिजमध्ये पोको एक्स ७ 5G आणि पोको एक्स ७ प्रो 5G स्मार्टफोनचा समावेश असून त्यावर डिस्काउंटही दिला जात आहे. नवीन पोको डिव्हाइसमध्ये ५० एमपी प्रायमरी कॅमेरा सेटअप आणि उत्तम बॅकअपसह बॅटरी आहे. नवीन डिव्हाइसेसवर मिळणाऱ्या ऑफर्स आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.
पोको एक्स ७ मध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस २ प्रोटेक्शनसह ६.६७ इंचाचा कर्व्ड एमोलेड 3D डिस्प्ले आहे. यात मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० अल्ट्रा प्रोसेसर देण्यात आला आहे. फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात ५० एमपी सोनी एलवायटी ६०० प्रायमरी कॅमेरा, ८ एमपी अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि २ एमपी तिसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. यात ४५ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.
पोको एक्स ७ ची सुरुवातीची किंमत १९ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे, जी ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या बेस व्हेरियंटची किंमत आहे. या फोनच्या टॉप व्हेरिएंटमध्ये ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असून त्याची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये कोणत्याही बँक कार्डद्वारे पेमेंट केल्यास २ हजार रुपयांची सूट देखील मिळणार आहे.
स्मार्टफोनमध्ये ६.७३ इंचाचा डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ३००० निट्सच्या पीक ब्राइटनेससह येतो. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी ८४०० अल्ट्रा प्रोसेसरवर काम करतो. फोटोग्राफीसाठी यात ५० मेगापिक्सलचा सोनी एलवायटी ६०० प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे, तर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. फोनमध्ये ६५५० एमएएचची मोठी बॅटरी आहे जी ९० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
पोको एक्स ७ प्रोच्या बेस व्हेरियंटची ( ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज) किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. तसेच या डिव्हाइसवर २,००० रुपयांची सूट दिली जात आहे.
संबंधित बातम्या