मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Poco X6 Neo: पोको एक्स ६ निओ स्मार्टफोनचे फीचर्स लीक, 'या' दिवशी होणार लॉन्च!

Poco X6 Neo: पोको एक्स ६ निओ स्मार्टफोनचे फीचर्स लीक, 'या' दिवशी होणार लॉन्च!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 11, 2024 10:26 AM IST

Set to Launch in India: पोको एक्स ६ निओ लवकरच भारतीय स्मार्टफोन बाजारात दाखल होणार आहे. मात्र, लॉन्चिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे फीचर्स लीक झाले आहेत.

Poco X6 Neo
Poco X6 Neo

Poco X6 Neo Specs: पोको एक्स ६ निओ येत्या १३ मार्च रोजी भारतीय स्मार्टफोन बाजारात दाखल होत आहे. मात्र, लॉन्चिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे फीचर्स लीक झाले आहेत. यापैकी काहींनी हा रेडमी नोट १३ आर प्रोचा रिब्रँडेड व्हेरियंट असल्याचे संकेत दिले आहेत. या फोनची खासियत म्हणजे, यात १०८ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा देण्यात येणार असल्याची माहिती आहे.

पोको इंडियाने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अधिकृत घोषणा करताना खुलासा केला आहे की, पोको एक्स ६ निओ येत्या १३ मार्च रोजी दुपारी १२ वाजता भारतीय बाजारात दाखल होईल. तसेच हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून खरेदी केला जाऊ शकतो, अशीही माहिती दिली. 

Samsung Galaxy S23: सॅमसंग गॅलेक्सी एस २३ मोठ्या डिस्काऊंटसह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध!

लीक झालेल्या माहितीनुसार, रिअर कॅमेरा मॉड्यूल मध्ये १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. पोको एक्स ६ निओ ८ जीबी रॅम आणि मल्टीपल स्टोरेज कॉन्फिगरेशनसह भारतात दाखल होईल. हा स्मार्टफोन १८ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीसह येण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली, जी ३३ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय 6.67 इंचाचा 120 हर्ट्झ फुल-एचडी+ ओएलईडी स्क्रीन, १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा सेकंडरी रिअर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

WhatsApp channel

विभाग