Smartphones Under 15000 : अवघ्या १५ हजारांत मिळतायेत 'हे' पाच धडाकेबाज 5G स्मार्टफोन!-poco realme vivo moto 5g smartphones under 15000 ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Smartphones Under 15000 : अवघ्या १५ हजारांत मिळतायेत 'हे' पाच धडाकेबाज 5G स्मार्टफोन!

Smartphones Under 15000 : अवघ्या १५ हजारांत मिळतायेत 'हे' पाच धडाकेबाज 5G स्मार्टफोन!

Sep 14, 2024 11:33 PM IST

5G Smartphones Under 15000: अवघ्या १५ हजारांत दमदार फिचर्स असलेल्या स्मार्टफोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी गूड न्यूज आहे.

१५ हजारांच्या आत मिळणारे 5G स्मार्टफोन
१५ हजारांच्या आत मिळणारे 5G स्मार्टफोन

 Budget Smartphones: कमी बजेटमध्ये चांगलाा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बाजारात असे काही बजेट स्मार्टफोन आहेत, ज्याची किंमत १५ हजारांपेक्षा कमी आहे. या यादीत आम्ही रियलमी, पोको आणि मोटो यांसारख्या ब्रँडचा समावेश केला आहे.

रियलमी नार्झो ७० टर्बो 5G

रियलमीने नुकताच हा फोन लॉन्च केला आहे. फोनच्या ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १६ हजार ९९९ रुपये आहे. परंतु, या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना २ हजार रुपयांचे डिस्काऊंट मिळत असल्याने हा फोन अवघ्या १४ हजार ९९९ रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो. अ‍ॅमेझॉन आणि कंपनीच्या अधिकृत साइटवर १६ सप्टेंबररोजी दुपारी १२ वाजता फोनची विक्री सुरू होणार आहे. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७३०० एनर्जी 5जी प्रोसेसर आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. यात ४५ वॅट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. 

पोको एक्स ६ निओ 5G

फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत १३,९९९ रुपये आहे. बँक ऑफरचा फायदा घेऊन १,००० रुपयांची सूट मिळू शकते, ज्यामुळे ८ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची प्रभावी किंमत १२९९९ रुपये होईल. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा अमोलेड डिस्प्ले आहे, जो कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ प्रोटेक्शनसह येतो. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६०८० प्रोसेसर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये १०८ मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. 

मोटो जी ६४ 5G

फोनच्या ८ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत १४,९९९ रुपये आहे. बँकेच्या ऑफर्सचा फायदा घेऊन त्याची किंमत कमी केली जाऊ शकते. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.५ इंचाचा फुल एचडी प्लस आयपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ७०२५ प्रोसेसर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि १६ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. 

विवो टी३ एक्स 5G

फोनचा ४ जीबी + १२८ जीबी मॉडेल फ्लिपकार्टवर १३ हजार ४९९ रुपयांसह लिस्ट झाला आहे. याचे ६ जीबी + १२८ जीबी मॉडेल देखील १५ हजारांपेक्षा कमी किंमतीत उपलब्ध असेल, जे फ्लिपकार्टवर १४ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन १५०० रुपयांची सूट मिळू शकते. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.७२ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ६ जेन १ प्रोसेसर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ४४ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.

ओप्पो के १२एक्स 5G

फोनच्या ६ जीबी + १२८ जीबी मॉडेलची किंमत १२,९९९ रुपये आहे. हा एक मजबूत फोन आहे आणि एमआयएल-एसटीडी -810 एच रेटिंगसह येतो. यात ३६० डिग्री डॅमेज प्रूफ आर्मर बॉडी मिळते, असे कंपनीचे म्हणणे आहे. फोनमध्ये १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटसह ६.६७ इंचाचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ६३०० प्रोसेसर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सलचा मुख्य रिअर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये ४५ वॉट सुपरव्हीओसी फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५१००० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहण्यासाठी हा फोन आयपी ५४ रेटिंगसह येतो.

Whats_app_banner
विभाग