POCO M6 Plus : दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा; पोको एम ६ प्लस 'या' दिवशी होतोय लॉन्च!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  POCO M6 Plus : दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा; पोको एम ६ प्लस 'या' दिवशी होतोय लॉन्च!

POCO M6 Plus : दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा; पोको एम ६ प्लस 'या' दिवशी होतोय लॉन्च!

Jul 30, 2024 09:33 PM IST

Poco M6 Plus Launching Date: पोकोचा नवा स्मार्टफोन येत्या ०१ ऑगस्ट २०२४ भारतीय बाजारात दाखल होणार आहे. फोनमध्ये १०८ मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आली.

पोको एम ६ प्लसमध्ये मिळणार हे दमदार फीचर्स
पोको एम ६ प्लसमध्ये मिळणार हे दमदार फीचर्स

Poco M6 Plus Price and Features: पोको कंपनीचा आगामी स्मार्टफोन पोको येत्या ०१ ऑगस्ट २०२४ रोजी भारतात लॉन्च होणार आहे. कंपनीने पोको एम ६ प्रो सोशल मीडियावर फोनचे डिझाइन आणि इतर फीचर्स टीज केले आहेत. पोको एम ६ प्लसचे स्पेसिफिकेशन्स आणि डिझाइन डिटेल्सची अधिकृत पुष्टी करण्यात आली आहे. 

पोको एम ६ प्लस १ ऑगस्ट रोजी भारतात पदार्पण करेल आणि पोको एम ६ सीरिजमध्ये सामील होईल. पोको एम ६ प्लस मिस्टी लॅव्हेंडर, आइस सिल्व्हर आणि क्लासिक ग्रॅफाइट ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येईल.

पोको एम ६ प्लस: रिंग फ्लॅश डिझाइन

पोको एम ६ प्लस हे दुहेरी बाजूचे ग्लास डिझाइन असलेले सेगमेंटमधील एकमेव मॉडेल असल्याची पुष्टी झाली आहे. पोको 'रिंग फ्लॅश डिझाइन'च्या एम्बोस्ड कॅमेरा मॉड्यूलला नाव देत आहे. हँडसेटमध्ये आता १२० हर्ट्झ अ‍ॅडेप्टिव्ह सिंकसह ६.७९ इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले असणार आहे. हा पोको एम 6 प्रो इतकाच स्क्रीन साइज आहे.

पोको एम ६ प्लस: रॅम आणि स्टोरेज

पोको एम ६ प्लस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ४ जेन २ एई (एक्सलेरेटेड एडिशन) चिपसेटसह येतो. कंपनीचा दावा आहे की चिपसेट अँटुटू बेंचमार्क प्लॅटफॉर्मवर ४६० के स्कोअर करू शकतो. या चिपसेटमध्ये ८ जीबी रॅम देण्यात आली असून ८ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे.

पोको एम ६ प्लस: १०८ एमपी ड्युअल कॅमेरा

हँडसेटमध्ये 3 एक्स इन-सेन्सर झूमसह मागील बाजूस १०८ एमपी ड्युअल कॅमेरा सिस्टम आहे. हे पोको एम ६ आणि एम ६ प्रोच्या ५० एमपी शूटरचे अपग्रेड आहे. सेल्फीसाठी फ्रंटमध्ये १३ मेगापिक्सलचा शूटर देण्यात आला आहे. हे पोको एम ६ प्रोच्या ८ एमपी शूटर आणि पोको एम ६ च्या ५ एमपी लेन्सचे अपग्रेड आहे

पोको एम ६ प्लस: बॅटरी

फ्लिपकार्ट मायक्रोसाइटने पुष्टी केली आहे की, पोको एम ६ प्लस मध्ये ३३ वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५०३० एमएएच बॅटरी असेल. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शन आहे. पोको एम ६ प्लस वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्ससाठी आयपी ५३ रेटिंग आणि साइड- माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल.

Whats_app_banner