आयर्न मॅन एडिशनसह पोको लॉन्च केला खास फोन, दिसायलाही छान; जाणून घ्या किंमत
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  आयर्न मॅन एडिशनसह पोको लॉन्च केला खास फोन, दिसायलाही छान; जाणून घ्या किंमत

आयर्न मॅन एडिशनसह पोको लॉन्च केला खास फोन, दिसायलाही छान; जाणून घ्या किंमत

Jan 09, 2025 11:03 PM IST

POCO Iron Man Edition Smartphone: पोकोने आज भारत आणि जागतिक बाजारपेठेत पोको एक्स ७ आणि पोको एक्स ७ प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत.

आयर्न मॅन एडिशनसह पोकोने लॉन्च केला खास फोन
आयर्न मॅन एडिशनसह पोकोने लॉन्च केला खास फोन

POCO Launches X7 Pro In Global Market: पोकोने आज भारत आणि जागतिक बाजारपेठेत पोको एक्स ७ आणि पोको एक्स ७ प्रो हे दोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनीने जागतिक बाजारपेठेसाठी लिमिटेड एडिशन पोको एक्स ७ प्रो आयर्न मॅन एडिशन मॉडेल लॉन्च केले आहे. फोनच्या बॅक पॅनेलवर आयर्न मॅन एडिशन डिझाइन देण्यात आले असले तरी स्पेसिफिकेशनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ग्राफिक्समुळे हा फोन एकदम स्टायलिश आणि सुंदर दिसत आहे.

पोकोने गेल्या वर्षी पोको एफ ६ डेडपूल लिमिटेड एडिशन लॉन्च करण्यासाठी मार्व्हलसोबत भागीदारी केली होती. परंतु, ती भारतीय बाजारपेठेपुरती मर्यादित होती, म्हणून मार्व्हलबरोबर पोकोचे हे पहिले जागतिक प्रॉडक्ट आहे.

स्पेशल एडिशनची वेगळी गोष्ट म्हणजे फोनच्या मागील बाजूस आयर्न मॅनआर्क रिअ‍ॅक्टरसह आयर्न मॅनचे घटक आहेत, यात लाल, काळे आणि सोनेरी घटक आहेत आणि यात लाल पॉवर बटन देखील आहे. फोनचे डिझाईन लपवत नाही आणि या केसवर टोनी स्टार्कची स्वाक्षरी आहे. स्पेशल एडिशनमध्ये कस्टम यूआय देखील आहे, जो फोनच्या लुकशी जुळतो आणि तो लाल चार्जिंग केबल आणि इजेक्टर टूलसह एका अनोख्या बॉक्समध्ये येतो.

पोको एक्स ७ स्पेशन एडिशन: किंमत

सध्या जागतिक बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहे. पोको एक्स ७ प्रो आयर्नमॅन लिमिटेड एडिशनच्या सिंगल १२ जीबी + ५१२ जीबी मॉडेलची किंमत ३९९ डॉलर (अंदाजे ३४,२५५ रुपये) आहे, सध्या त्याची किंमत ३६९डॉलर (अंदाजे ३१,६८० रुपये) आहे. आजपासून म्हणजेच ९ जानेवारी २०२५ पासून निवडक देशांमध्ये ओपन सेलसह उपलब्ध होईल. मात्र, मर्यादित युनिट्सच उपलब्ध होतील, असे कंपनीने म्हटले आहे. हा फोन भारतात लॉन्च होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

पोको एक्स ७ प्रो: किंमत

पोको एक्स ७ प्रोच्या ८ जीबी रॅम + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. तर, १२ जीबी रॅम + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत २८ हजार ९९९ रुपये आहे. आयसीआयसीआय बँकेच्या कार्डद्वारे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना २००० रुपयांची सूट दिली जात आहे. पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना १,००० रुपयांचा कूपन डिस्काउंट मिळणार आहे. कंपनी या फोनवर तीन वर्षांचे ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे.

Whats_app_banner