Smartphones Under 10000: पोकोने आपला नवा स्मार्टफोन पोको सी ७५ जागतिक स्तरावर लॉन्च केला आहे. पोकोचा हा लो बजेट स्मार्टफोन असून याची सुरुवातीची किंमत १० हजारांपेक्षा कमी आहे. कंपनीने ऑगस्टमध्ये लॉन्च केलेल्या रेडमी १४ सीचे हे रिब्रँडेड व्हर्जन आहे आणि दोन्ही स्मार्टफोनमधील अनेक स्पेसिफिकेशन्स सारखेच आहेत. पोको सी ७५ मध्ये मीडियाटेक हेलियो जी ८ अल्ट्रा चिपसेट आहे, ज्यात ८ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत स्टोरेज आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा असून १८ वॅट चार्जिंग सपोर्टसह ५ हजार १६० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ वर चालतो.
रॅम आणि स्टोरेजनुसार पोको सी ७५ दोन व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याच्या ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १०९ डॉलर (सुमारे ९ हजार ७० रुपये) आणि ८ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १२९ डॉलर (सुमारे १० हजार ९०० रुपये) आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 'अर्ली बर्ड' किमती आहेत. म्हणजेच कंपनी नंतर या किंमतीतही बदल करू शकते. कंपनीने याला ब्लॅक, गोल्ड आणि ग्रीन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च केले आहे.
पोको सी ७५ स्मार्टफोन मध्ये ६.८८ इंचाचा एचडी प्लस (७२०×१६४० पिक्सल) एलसीडी डिस्प्ले आहे, जो १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि ६०० निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. फोनमध्ये मीडियाटेकचा हेलियो जी८१ अल्ट्रा चिपसेट आणि ८ जीबी पर्यंत रॅम देण्यात आली आहे. हा फोन २५६ जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेजसह येतो.
फोटोग्राफीसाठी पोको सी ७५ मध्ये एफ/१.८ अपर्चरसह ५० मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये एफ/२.० अपर्चरसह १३ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
फोनमध्ये १८ वॉट चार्जिंग सपोर्टसह ५१६० एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बॉक्ससोबत चार्जर येणार नाही, याची काळजी घ्या. सुरक्षिततेसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ४जी एलटीई, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.४, जीपीएस, एनएफसी, ३.५ एमएम हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट चा समावेश आहे. यात एम्बियंट लाइट सेन्सर, एक्सेलेरोमीटर, ई-कंपास आणि व्हर्च्युअल प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आला आहे.