Poco C75 5G Launched in India: जर तुम्हाला फीचर फोनच्या रेंजमध्ये 5G स्मार्टफोन खरेदी करायचा असलेल्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. पोको तुमच्यासाठी एक नवीन परवडणारा 5G स्मार्टफोन घेऊन आला आहे. पोकोने आपला लेटेस्ट बजेट 5G स्मार्टफोन पोको सी ७५ 5G भारतात लॉन्च केला आहे. यात एचडी+ रिझोल्यूशन आणि ६०० निट्स ब्राइटनेससह १२० हर्ट्झ एलसीडी स्क्रीनसह ६.८८ इंच डिस्प्ले मिळत आहे. या एंट्री लेव्हल फोनमध्ये ५० एमपी कॅमेरा आणि ५ हजार १६० एमएएच बॅटरी आहे.
पोकोचा हा फोन केवळ एका व्हेरियंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. पोको सी ७५ 5Gच्या ४ जीबी रॅम + ६४ जीबी व्हेरिएंटची किंमत ७ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ग्रीन, अॅक्वा ब्लू आणि सिल्वर स्टारडस्ट कलरमध्ये येतो. हा फोन १९ डिसेंबरपासून दुपारी १२ वाजता फ्लिपकार्टवर पहिल्यांदा उपलब्ध होणार आहे.
पोको सी ७५ हा 5G बजेट फोन आहे जो स्नॅपड्रॅगन ४ एस जेन २ चिपसेटसह येतो. यात एचडी+ रिझोल्यूशन आणि ६०० निट्स ब्राइटनेससह ६.८८ इंचाची १२० हर्ट्झ एलसीडी स्क्रीन आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य रिअर कॅमेरा असेल. तर, कंपनी सेल्फीसाठी ५ मेगापिक्सेल कॅमेरा देखील देत आहे. फोनमध्ये ५ हजार १६० एमएएचची बॅटरी मिळते.
याशिवाय, कंपनीने पोको एम७ प्रो 5G फोन देखील लॉन्च केला आहे. यात ६.६७ इंचाचा फुल एचडी एमोलेड डिस्प्ले मिळत आहे, जो गोरिल्ला ग्लास ५ सह येतो. यात MediaTek डायमेंशन ७०२५ अल्ट्रा चिपसेट आहे.हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८/२५० जीबी स्टोरेज स्टोरेज पर्यायांसह येतो. त्यांची किंमत अनुक्रमे १३ हजार ९९९ रुपये आणि १५ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळत आहे. तर, सेल्फीसाठी २० मेगापिक्सेल कॅमेरा आहे. या फोनमध्ये ५ हजार ११० एमएएच क्षमता असलेली बॅटरी देण्यात आली आहे, जी ४५ वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो.
संबंधित बातम्या