PNB Fixed Deposit Rates : पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. बँकेनं पुन्हा एकदा मुदत ठेवींच्या दरात वाढ करण्याची घोषणा केली आहे. नवे व्याजदर ८ जानेवारीपासून लागू होणार आहेत.
पंजाब नॅशनल बँकेनं अवघ्या दहा दिवसांत दुसऱ्या व्याजदर वाढीची घोषणा केली आहे. याआधी देखील २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेवरील एफडीच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. १ जानेवारीपासून हे व्याजदर लागू झाले होते. त्यानंतर आता पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळं पीएनबी बँकेच्या एफडीवरील सर्वाधिक व्याजदर ८.०५ टक्क्यांवर गेला आहे.
याआधी १ जानेवारी रोजी, बँकेनं काही कालावधीच्या एफडीवर ०.४५ टक्क्यांपर्यंत व्याजदर वाढवले होते आणि इतर मुदत ठेवींवरील दर कमी केले होते. आता बँकेनं ३०० दिवसांत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवरील व्याजदर ६.२५ टक्क्यांवरून ७.०५ टक्क्यांपर्यंत वाढवले आहेत. सर्वसामान्य ग्राहकांना ७ दिवस ते १० वर्षात परिपक्व होणाऱ्या ठेवींवर ३.५ ते ७.२५ पर्यंत व्याज दिले जाते.
७ ते १४ दिवस - ३.५० टक्के
१५ ते २९ दिवस - ३.५० टक्के
३० ते ४५ दिवस - ३.५० टक्के
४६ ते ६० दिवस - ४.५० टक्के
६१ ते ९० दिवस - ४.५० टक्के
९१ ते १७९ दिवस - ४.५० टक्के
१८० ते २७० दिवस - ६ टक्के
२७१ ते २९९ दिवस - ६.२५ टक्के
३०० दिवस - ७.०५ टक्के
३०१ ते ३६४ दिवस - ६.२५ टक्के
१ वर्ष - ६.७५ टक्के
४०० दिवस - ७.२५%
४०१ दिवस ते २ वर्षे - ६.८० टक्के
२ वर्षांपेक्षा जास्त ते ३ वर्षे - ७ टक्के
३ वर्षांपेक्षा जास्त ते ५ वर्षे - ६.५० टक्के
५ वर्षांपेक्षा जास्त ते १० वर्षे - ६.५० टक्के
नव्या निर्णयामुसार, पीएनबी सात दिवस ते दहा वर्षांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर ४ टक्के ते ७.७५ टक्क्यांपर्यंत व्याजदर देणार आहे. अति ज्येष्ठ नागरिकांसाठी हाच व्याजदर ४.३ टक्के ते ८.०५ टक्क्यांपर्यंत असेल.
संबंधित बातम्या