मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PMSBY Scheme : केवळ २० रुपये गुंतवा , मिळेल लाखोंचा फायदा, ही आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

PMSBY Scheme : केवळ २० रुपये गुंतवा , मिळेल लाखोंचा फायदा, ही आहे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 30, 2023 07:37 PM IST

PMSBY : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही केंद्र सरकारची योजना आहे. त्याचा लाभ ग्रामीण भागातील लोकंही घेऊ शकतात. केवळ २० रुपयांपासून गुंतवणूकीस सुरुवात करुन त्यातून लाखो रुपयांचा फायदा घेता येईल. या योजनेत कशी कराल गुंतवणूक याविषयी जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

PMSBY Scheme
PMSBY Scheme

PMSBY : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY) ही केंद्र सरकारची एक अशी योजना आहे, ज्यात सामील होऊन गरीब लोक देखील 2 लाख रुपयांपर्यंत लाभ घेऊ शकतात. देशात अनेक वर्षांपासून ही योजना सुरू असली तरी अद्यापही देशातील कोट्यवधी लोकांना सरकारी योजनेची माहिती नाही. त्यामुळे ते पात्र असूनही योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. इच्छुक लाभार्थ्यांनी दरमहा फक्त २० रुपये गुंतवणूक करुनही या योजनेची सुरुवात करता येते. त्यानंतर तुम्ही २ लाखांपर्यंत पात्र ठरतात.

या योजनेशी संबंधित लोकांचे नातेवाईक. अपघाती निधन झाल्यास आणि कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास त्यांना २ लाख रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे, कायमस्वरूपी आंशिक अपंगत्वासाठी १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम दिली जाते.

या प्लॅनमध्ये प्रीमियमची रक्कम लाभार्थी ऑटो डेबिट सुविधेचा वापर करूनही भरु शकतात. एका वेळी प्रति वर्ष २० रुपये जमा करू शकतो. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना १८ वर्षे ते ७० वर्षे वयोगटातील लोकांसाठी उपलब्ध आहे. लाभार्थीचे वय ७० वर्षे झाल्यावर हा विमा संपुष्टात येतो.

जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुमच्या खात्यात ठराविक मुदत ठेव रक्कम ठेवणे आवश्यक आहे. यासोबतच संबंधित बँक खात्याचे केवायसी असणे आवश्यक आहे. तुम्हाला पीएमएसबीवायच्या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. यासोबतच तुम्ही यासाठी ऑफलाइनही अर्ज करू शकता. यासाठी, तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेला भेट देऊन अर्ज करू शकता किंवा तुम्ही जवळ जाऊन आणि इंटरनेट बँकिंगद्वारे देखील या योजनेसाठी नावनोंदणी करू शकता.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग