PM Kisan : प्रतीक्षा संपली! पीएम किसान योजनेचे पैसे उद्या खात्यात जमा होणार-pm kisan scheme 16th installment waiting is over modi government will release on 28th february beneficiaries good news ,बिझनेस बातम्या
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  PM Kisan : प्रतीक्षा संपली! पीएम किसान योजनेचे पैसे उद्या खात्यात जमा होणार

PM Kisan : प्रतीक्षा संपली! पीएम किसान योजनेचे पैसे उद्या खात्यात जमा होणार

Feb 27, 2024 10:35 AM IST

PM Kisan nidhi 16th installment : पीएम किसान निधीची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूषखबर आहे.

PM Kisan Yojana 16th Installment
PM Kisan Yojana 16th Installment

PM Kisan Nidhi 16th Installment : पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या १६व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. केंद्र सरकार उद्या, २८ फेब्रुवारी रोजी या हप्त्याचे २,००० रुपये कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करणार आहेत. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर यास दुजोरा देण्यात आला आहे.

पीएम-किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दर चार महिन्यांनी डीबीटीद्वारे तीन समान हप्त्यांमध्ये ६ हजार रुपये मिळतात. ही योजना यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी, २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सुरू करण्यात आली होती. या अंतर्गत पहिल्या हप्त्यात ३१६१६९१८ शेतकरी कुटुंबांच्या खात्यावर पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे २००० रुपये पाठवण्यात आले. तेव्हापासून लाभार्थ्यांची संख्या जवळपास तिप्पट झाली आहे. शेवटचा म्हणजे १५ वा हप्ता ९०१७३६६९ शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला होता.

पीएम किसानच्या ताज्या यादीत तुमचं नाव असं तपासा

सर्वप्रथम पीएम किसान पोर्टलवर जा (https://pmkisan.gov.in/).

तिथं उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर पहा. इथं लाभार्थी यादीवर क्लिक करा.

तुम्हाला एक नवीन विंडो उघडलेली दिसेल. तिथं आताची नवी यादी सापडेल. यासाठी नियुक्त केलेल्या ठिकाणी तुमचं राज्य, जिल्हा, उपजिल्हा म्हणजे तहसील, ब्लॉक आणि गाव निवडा. यानंतर Get Report वर क्लिक करा. तुमच्या गावाची संपूर्ण यादी तुमच्या समोर असेल.

सद्यस्थिती अशी तपासा!

तुमचे कोणते हप्ते मिळाले किंवा मिळाले नाहीत? पैसे थांबले असतील तर त्याचं कारण काय? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, तुमची लाभार्थी स्थिती तपासा. त्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा..

नो युवर स्टेटस ऑन फार्मर कॉर्नरवर क्लिक करा.

तुम्हाला एक नवीन विंडो उघडलेली दिसेल. दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा नोंदणी क्रमांक टाका. कॅप्चा कोड भरा आणि Get OTP वर क्लिक करा.

आधारशी लिंक केलेल्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP टाकून तुमची स्थिती तपासा.

जर तुम्हाला नोंदणी क्रमांक माहीत नसेल. वरील निळ्या पट्टीवर तुमचा नोंदणी क्रमांक लिहिलेला असेल. त्यावर क्लिक करा. तुमचा आधार क्रमांक किंवा लिंक केलेला मोबाईल क्रमांक टाका. कॅप्चा कोड टाकून नोंदणी क्रमांक मिळवा आणि पुन्हा पहिली प्रक्रिया करा.

विभाग