मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price today : आज ११ जानेवारी, तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर तपासा

Petrol diesel price today : आज ११ जानेवारी, तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर तपासा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 11, 2023 08:25 AM IST

Petrol diesel price today : ११ जानेवारीसाठी देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. आज तुमच्या शहरातील नवीनतम दर काय आहेत ते येथे जाणून घ्या.

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol diesel price today :  आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कच्च्या तेलाच्या घसरणीचा किंवा वाढीचा फायदा पेट्रोल आणि डिझेलमध्ये दिसेल का, याचे उत्तर तेल वितरक कंपन्यांनी आज दिले आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी आज म्हणजेच ११ जानेवारीसाठी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. खरं पाहता, २२  मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ही बाब दिलासादायक आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता अपडेट केले जातात. देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात आणि त्यानंतर लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमतींची माहिती मिळते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल महागात पडण्याचे कारण आहे.

आजचे दर एसएमएसद्वारे जाणून घ्या

तुम्ही एसएमएसद्वारे पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता (रोज डिझेल पेट्रोलची किंमत कशी तपासावी). इंडियन ऑइलचे ग्राहक ९२२४९९२२४९ वर एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात आणि बीपीसीएल ग्राहक ९२२३१११२२२२ वर आरएसपी एसएमएस पाठवून माहिती मिळवू शकतात. त्याच वेळी, HPCL ग्राहक 9222201122 क्रमांकावर HPPprice पाठवून देखील शोधू शकतात.

तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलच्या किंमती 

शहरपेट्रोल डिझेल
मुंबई१०६.३१94.27 
दिल्ली९६.७२ ८९.६२
चेन्नई१०२.६२९४.२४
कोलकाता    १०६.०३    ९२.७६
बेंगलुरु१०१.९४८७.८९
लखनऊ९६.५७८९.७६
नोएडा९६.७९८९.९६

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग