मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price today : अपडेट झाल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती, प्रमुख महानगरांतील दर असे आहेत!

Petrol diesel price today : अपडेट झाल्या पेट्रोल डिझेलच्या किंमती, प्रमुख महानगरांतील दर असे आहेत!

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 19, 2023 08:17 AM IST

Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. तुमच्या शहरांतील किंमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

Petrol price HT
Petrol price HT

Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज कंपन्यांनी दिल्ली आणि चेन्नईमध्ये तेलाच्या किमती बदलल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याची घोषणा केली होती. गेल्या चार महिन्यांहून अधिक काळ देशातील तेलाच्या किमती स्थिर आहेत.

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये तर डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. नवे दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

या मानकांच्या आधारे पेट्रोलचे दर आणि डिझेलचे दर दररोज ठरवण्याचे काम तेल कंपन्या करतात. पेट्रोल डीलर्स ग्राहकांना कर आणि स्वतःचे मार्जिन जोडून किरकोळ किमतीत पेट्रोल विकतात. हा खर्च पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही जोडला जातो.

एसएमएसवर पेट्रोल डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलचे दर

शहर पेट्रोल डिझेल
नवी दिल्ली९६.७२८९.६२
कोलकाता१०६.०३९२.७६
चेन्नई१०२.७३९४.३३
बंगळूरु१०१.९४८७.८९
हैदराबाद१०९.६६९४.७५
नोएडा९६.६४८९.६५
भूवनेश्वर१०३.१८९४.७५

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग