Petrol Diesel price today : मुंबईत पेट्रोल १०६.३१ रु.,डिझेल ९४.२७ रु., राज्यातील विविध शहरांत दर पहा
Petrol Diesel price today 24 January 2023 : जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत वाढ होत असून ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल $ ९० च्या जवळ पोहोचली आहे. देशाच्या काही शहरांमध्ये किंमतींमध्ये वाढ झाली असून महाराष्ट्रात मात्र अद्याप पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. राज्यातील तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
Petrol Diesel price today 24 January 2023 : जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतीत वाढ होत असून ब्रेंट क्रूडची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल $ ९० च्या जवळ पोहोचली आहे. दरम्यान, मंगळवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी जाहीर केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतींमध्येही वाढ दिसून येत आहे. परिणामी देशातील अनेक शहरांमध्ये आज अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत. मात्र, आजही दिल्ली-मुंबईसारख्या देशातील चारही महानगरांमध्ये दर स्थिर आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, आज सकाळी हरियाणाच्या गुडगावमध्ये पेट्रोल २ पैशांनी महाग होऊन ९६.९९ रुपये प्रति लिटर झाले तर डिझेल २ पैशांनी वाढल्यानंतर ८९.८६ रुपये प्रति लिटरवर झाले आहे. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पेट्रोल ३६ पैशांनी वाढून १०८.४४ रुपये प्रति लिटर तर डिझेल ३२ पैशांनी वाढून ९३.६८ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. बिहारची राजधानी पटनामध्ये पेट्रोलचा दर ४ पैशांनी वाढून १०७.८० रुपये प्रति लिटर झाला आहे, तर डिझेल ४ पैशांनी वाढून ९४.५६ रुपये प्रति लिटरवर पोहोचला आहे.
महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत पेट्रोल डिझेलच्या किंमती अद्याप स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे. याशिवाय राज्यातील विविध शहरांतील पेट्रोल डिझेलच्या किंमती पुढीलप्रमाणे -
शहर | पेट्रोल | डिझेल |
नागपूर | १०७.०१ | ९५.०१ |
पुणे | १०६.०० | ९२.५५ |
अहमदनगर | १०६.८१ | ९३.३३ |
नाशिक | १०६.९१ | ९३.४३ |
औरंगाबाद | १०७.८१ | ९५.८२ |
रत्नागिरी | १०८.०७ | ९४.६१ |
बीड | १०७.६२ | ९४.१६ |
उस्मानाबाद | १०७.२६ | ९३.७७ |
जळगाव | १०७.८० | ९४.३० |
संबंधित बातम्या
विभाग