मराठी बातम्या  /  business  /  Petrol diesel price today : बजेटपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होतील का? पहा आजचे लेटेस्ट दर
Petrol diesel HT
Petrol diesel HT

Petrol diesel price today : बजेटपूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होतील का? पहा आजचे लेटेस्ट दर

25 January 2023, 9:01 ISTKulkarni Rutuja Sudeep

Petrol diesel price today : पेट्रोल डिझेलच्या किंमती २४९ व्या दिवशीही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड तेलाच्या किंमती ९० डाॅलर्स प्रती बॅरल्सपर्यंत पोहोचल्या आहेत. बजेटपूर्वी सर्वसामान्यांना किंमतींबाबत दिलासा मिळेल का याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

Petrol Diesel price today 25 January 2023  पेट्रोल डिझेलच्या किंमती २४९ व्या दिवशीही स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रुड तेलाच्या किंमती ९० डाॅलर्स प्रती बॅरल्सपर्यंत पोहोचल्या आहेत. बजेटपूर्वी सर्वसामान्यांना किंमतींबाबत दिलासा मिळेल का याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अर्थंमंत्री निर्मला सितारमण १ फेब्रुवारीला केंद्रीय बजेट सादर करणार आहेत. त्यापूर्वी पेट्रोल डिझेलच्या किंमतीत दिलासा मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वास्तविक पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी तेल कंपन्यांना पेट्रोल डिझेलच्या किंमती घटवण्याची शिफारस केली आहे. ज्यानंतर पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होतील का असाच प्रश्न विचारला जातोय.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. नवे दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होणार आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये तर डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

शहरपेट्रोल डिझेल 
गुडगाव९६.९२८९.७९
नोएडा९६.५९८९.७६
बंगळूरु१०१.९४८७.८९
चंदीगड९६.२०९४.५८
हैदराबाद१०९.६६८४.२६
जयपूर१०८.४८९३.७२
लखनऊ९६.५७८९.७६

विभाग