मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, तुमच्या शहरात असे आहेत दर

Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल-डिझेलचे दर, तुमच्या शहरात असे आहेत दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 17, 2023 09:05 AM IST

Petrol diesel price today : तेल कंपन्यांनी आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमती ८५ डाॅलर्स प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत पण देशांतर्गत पातळीवर पेट्रोल डिझेलच्या दरात. २२ मे पासून कोणताही बदल झालेला नाही.

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol diesel price today : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झालेला नाही. आज १७ जानेवारीसाठी, देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. २२ मे २०२२ पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरवर उपलब्ध आहे. मुंबईत पेट्रोलचा दर १०६.३१ रुपये आणि डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोलचा दर १०६.०३ रुपये तर डिझेलचा दर ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. तर चेन्नईमध्येही पेट्रोल १०२.६३ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

एसएमएसवर पहा पेट्रोल डिझेलच्या किंमती

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

देशातील इतऱ शहरांतील पेट्रोल डिझेलचे दर

शहरपेट्रोल डिझेल
बंगळूरु१०१.९४८७.८९
लखनऊ९६.५७८९.७६
नोएडा९६.७९८९.९६
गुरुग्राम९७.१८९०.०५
चंदीगड९६.२०८४.२६
मुंबई१०६.३१९४.२७

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग