मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol diesel price : क्रूड तेल दरात घट, महागड्या पेट्रोल डिझेलपासून सुटका नाहीच !

Petrol diesel price : क्रूड तेल दरात घट, महागड्या पेट्रोल डिझेलपासून सुटका नाहीच !

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 09, 2023 08:49 AM IST

Petrol diesel price today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत.महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून लोकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही.

petrol pump_HT
petrol pump_HT

Petrol diesel price today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत. अशा स्थितीत पेट्रोल आणि डिझेलच्या ताज्या किमतींवर त्याचा परिणाम होईल का, याचे उत्तर देशातील तेल विपणन कंपन्याच देऊ शकतात. तेल विपण कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर केल्या आहेत आणि आजची नवीनतम किंमत अपडेट केली आहे. तसे २२ मे पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. ९ जानेवारीला जाहीर झालेल्या ताज्या किमतींनुसार, महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून लोकांना अजूनही दिलासा मिळालेला नाही.

देशातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. ९ जानेवारीसाठीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलची नवीनतम किंमत मुंबई ते दिल्ली अद्ययावत करण्यात आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता अपडेट केले जातात. देशातील तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात आणि त्यानंतर लोकांना पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किंमतींची माहिती मिळते. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल महागात पडण्याचे कारण आहे.

शहरपेट्रोलडिझेल
मुंबई१०६.३१९४.२७ 
दिल्ली९६.७२८९.६२
 १०२.५३९४.२४
कोलकाता    १०६.०३९२.७६
बेंगलुरु१०१.२४८९.८९
लखनऊ९६.५७८९.७६
नोएडा९६.७९८९.९६
चंडीगढ़९६.२०८४.२६
पटना१०७.२४९४.०४

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग