मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : बजेटपूर्वी कमी होतील का पेट्रोल डिझेलच्या किंमती ? पहा आजचे दर

Petrol Diesel price today : बजेटपूर्वी कमी होतील का पेट्रोल डिझेलच्या किंमती ? पहा आजचे दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jan 30, 2023 09:11 AM IST

Petrol Diesel price today 30 January 2023 : आज ३० जानेवारीला दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर, तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे.

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol Diesel price today 30 January 2023 : भारतीय तेल विपणन कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही, ही दिलासादायक बाब आहे. यासोबतच, आज ३० जानेवारी २०२३ रोजी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लीटर, तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लीटर आहे. दुसरीकडे, चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे.

सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल

राजस्थानातील गंगानगर आणि हनुमानगड जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल विकले जात आहे. गंगानगरमध्ये पेट्रोल ११३.४८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९८.२४ रुपये प्रति लिटर आहे. तर हनुमानगड जिल्ह्यात पेट्रोल ११२.५४ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९७.३९ रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे.

सर्वात स्वस्त पेट्रोल आणि डिझेल

पोर्ट ब्लेअरमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल विकले जात आहे. जिथे पेट्रोल ८४.१० रुपये प्रति लिटर आणि डिझेल ७९.७४ रुपये प्रति लिटर आहे.

एसएमएसवर पेट्रोल डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग