मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमतींमध्ये घट, या शहरांमध्ये बदलल्या किंमती

Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमतींमध्ये घट, या शहरांमध्ये बदलल्या किंमती

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 31, 2023 08:42 AM IST

Petrol Diesel price today 31 May 2023 : जागतिक बाजारात कच्चे तेल आज खूपच स्वस्त झाले असून देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाल्याची बातमी आली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरात इंधनाचे दर किती कमी झाले आहेत.

petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel price today 31 May 2023 : देशातील सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. या आधारे आजही देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नसल्याचे दिसून येते. मात्र, आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या किमती आज ४.५८ टक्क्यांनी घसरून ७३.५४ डॉलर प्रति बॅरलवर आल्या. याशिवाय, डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे आणि ती प्रति बॅरल ६९.४८ डाॅलर्सवर व्यापार करत आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती

  • नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे
  • मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे
  • कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे
  • चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६५ रुपये आणि डिझेल ९४.२५ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग