Petrol Diesel price today 30 August 2023 : अमेरिकेच्या स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह (SPR) मधून आश्चर्यकारक प्रमाणात कच्चे तेल काढले जात आहे. गेल्या आठवड्यात क्रूड इन्व्हेंटरीमधून ११४८६ दशलक्ष बॅरल क्रूड मोठ्या प्रमाणात काढले गेले. मंगळवारी यासंबंधीची आकडेवारी समोर येताच ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ८५.५० डाॅलर्सवर पोहोचली.
यामुळे, ब्रेंट क्रूडची किंमत मंगळवारी संध्याकाळी ४:१६ वाजता १.२८ टक्क्यांनी वाढून ८५.५० बॅरलवर पोहोचली. मागील आठवड्याच्या तुलनेत त्यात प्रति बॅरल १.५० डाॅलर्सची वाढ झाली आहे.
मात्र देशांतर्गत पातळीवर पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट करतात. त्यानुसार आज सकाळी सहा वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले आहेत.
तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशाच्या राजधानीत दिल्लीत पेट्रोल-डिझेल ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.
संबंधित बातम्या