Petrol Diesel price today 29 August 2023 : दररोजप्रमाणेच सरकारी तेल कंपन्यांनी मंगळवारीही पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आज भारतातील अनेक शहरांमध्ये इंधन दरात बदल झाला आहे. त्यात एका मेट्रो सिटीच्या नावाचाही समावेश आहे. चेन्नईमध्ये आज पेट्रोल १४ पैशांनी १०२.७७ रुपये आणि डिझेल १३ पैशांनी ९४.३७ रुपये महागले आहे.पुणे शहरात पेट्रोल ९४ पैशांनी स्वस्त होऊन १०५.९१ रुपये आणि डिझेल ९३ पैशांनी स्वस्त होऊन ९२.४३ रुपये स्वस्त विकले जात आहे.
मंगळवारी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण होताना दिसत आहे. WTI क्रूड ऑइल आज ०.०४ टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल ८०.०७ डाॅलर्सवर आहे. दुसरीकडे, जर आपण ब्रेंट क्रूड ऑइलबद्दल बोललो तर आज ते ०.०४ टक्क्यांनी कमी होत आहे आणि ते प्रति बॅरल ८४.३९ डाॅलर्सवर व्यापार करत आहे.
तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशाच्या राजधानीत दिल्लीत पेट्रोल-डिझेल ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.