मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel Price Today : आज अपडेट झाले पेट्रोल डिझेलचे दर, चेक करा मुंबई, पुण्यासह देशातील विविध शहरांतील दर

Petrol Diesel Price Today : आज अपडेट झाले पेट्रोल डिझेलचे दर, चेक करा मुंबई, पुण्यासह देशातील विविध शहरांतील दर

Aug 27, 2023 08:08 AM IST

Petrol Diesel price today 27 August 2023 : तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये दर जाहीर झाले आहेत. दिल्लीपासून ते मुंबईपर्यंत राष्ट्रीय पातळीवर तेलाच्या किंमतीत बदल झालेला नाही.

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol Diesel price today 27 August 2023 : तेल कंपन्यांनी दररोजप्रमाणे सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाच्या किंमतींच्या आधारावर पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले जातात.

ट्रेंडिंग न्यूज

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड तेल प्रति बॅरल ८४.४८ डॉलर आणि डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल ७९.८३ डॉलर आहेत. देशात राज्य पातळीवर विविध प्रकारचे कर, शुल्काच्या आधारावर पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात.

महानगरांतील दर

तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशाच्या राजधानीत दिल्लीत पेट्रोल-डिझेल ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

तुमच्या शहरातील दर SMS वर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel
विभाग