मराठी बातम्या  /  business  /  Petrol Diesel price today : एका लीटरसाठी आज इतके मोजावे लागतील रुपये, पाहा आजचे पेट्रोल डिझेलचे दर
petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel price today : एका लीटरसाठी आज इतके मोजावे लागतील रुपये, पाहा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

25 May 2023, 8:46 ISTKulkarni Rutuja Sudeep

Petrol Diesel price today 25 May 2023 : २२ मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परिणामी पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम झालेला नाही.

Petrol Diesel price today 25 May 2023 : मे महिना संपत आला आहे आणि २५ मे साठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. २५ मे च्या ताज्या यादीनुसार, देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अजूनही स्थिर असून येथे कोणताही बदल करण्यात आलेला नाही. २२ मे पासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कच्चे तेल स्वस्त आणि महाग झाल्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम झालेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अपडेट करतात. किंमतींमध्ये काही बदल झाल्यास कंपन्या वेबसाइटवर अपडेट करतात. तथापि, जर तुम्हाला तुमच्या शहराची किंमत जाणून घ्यायची असेल, तर तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत वेगवेगळ्या प्रकारे जाणून घेऊ शकतात.

चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

चेन्नई-पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर

मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

विभाग