Petrol Diesel price today : पुणेकरांनो, संडे स्पेशल टूर प्लान करताहात ? येथे चेक करा आजचे पेट्रोल डिझेलचे दर
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : पुणेकरांनो, संडे स्पेशल टूर प्लान करताहात ? येथे चेक करा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel price today : पुणेकरांनो, संडे स्पेशल टूर प्लान करताहात ? येथे चेक करा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Published Sep 24, 2023 08:28 AM IST

Petrol Diesel price today 24 September 2023 : आज रविवारी पुण्यात पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही आज संडे स्पेशल टूरचा प्लान करत असाल तर त्यापूर्वी तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचे दर येथे जाणून घ्या.

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol Diesel price today 24 September 2023 : संपूर्ण देशभरात इंधनाचे दर दररोज अपडेट केल्या जातात. रविवारसाठी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. सगळ्यात आधी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईसाठी किंमती स्थिर आहेत. तर चेन्नईमध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी झाले आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोल ११ पैशांनी स्वस्त होऊन १०२.६३ रूपये आणि डिझेल ९ पैशांनी स्वस्त होऊन ९४.२४ रूपये झाले आहे. तर नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये रूपये झाले आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये लीटर दराने विकले जात आहे.

खनिज तेलाच्या किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत चढ-उतारांचा ट्रेंड आहे. WTI क्रूड ऑइलच्या किमती आठवड्याच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी ०.४५ टक्क्यांच्या वाढीसह ते प्रति बॅरल ९०.०३ डाॅलर्सवर बंद झाले. ब्रेंट क्रूडच्या किंमतीत ०.०३ टक्क्यांची घसरण दिसून आली. ती प्रति बॅरल ९३.२७ डाॅलर्सवर कायम आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार सुरूच असतात. त्यानुसार देशांतर्गत पातळीवर लागणाऱ्या विविध करांच्या पार्श्वभूमीवर आज पेट्रोल डिझेलच्या दरात कमी अधिक प्रमाणात बदल झाला आहे.

तुमचा स्मार्टफोन तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

Whats_app_banner