Petrol Diesel price today : पेट्रोल पंपावर वाढती गर्दी, २००० रुपयांची नोट देण्यापूर्वी इथे चेक करा पेट्रोल डिझेलचे दर
Petrol Diesel price today 24 May 2023 : बुधवारी भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल झाला आहे. जाणून घ्या आज कोणत्या शहरांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत.
Petrol Diesel price today 24 May 2023 : देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सरकारी तेल कंपन्यांकडून जारी केले जातात. आजच्या घडीला अनेक मोठ्या शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. अशा स्थितीत इंधन भरण्यापूर्वी प्रमुख शहरांतील दर तपासणे आवश्यक आहे.
ट्रेंडिंग न्यूज
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ नोंदवली जात आहे. ब्रेंट क्रूड ऑइलच्या किंमतीत १.०८ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. ते प्रति बॅरल ७७.६७ डाॅलर्सवर ट्रेड करत आहे. त्याच वेळी, डब्ल्यूटीआय क्रूड ऑइलच्या किंमतीत १.१७ टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि ते प्रति बॅरल ७३.७६ डाॅलर्सवर ट्रेड करत आहे.
चार महानगरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर
दिल्ली- पेट्रोल ९६.७२ रुपये, डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर
चेन्नई-पेट्रोल १०२.६३ रुपये, डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर
मुंबई- पेट्रोल १०६.३१ रुपये, डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर
कोलकाता- पेट्रोल १०६.०३ रुपये, डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर
इतर शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत?
नोएडा-पेट्रोल ३५ पैशांनी स्वस्त झाले. किंमत ९६.९४ रुपये, डिझेल ३२ पैशांनी स्वस्त किंमत ९०.१४ रुपये स्वस्त
गुरुग्राम - पेट्रोल ४१ रुपयांनी स्वस्त. किंमत ९६.७७ रुपये. डिझेल ४० पैशांनी महाग. किंमत ९४.१४ रुपयांनी महाग
लखनौ- पेट्रोल १५ पैशांनी स्वस्त. किंमत ९६.४७ रुपये, डिझेल १५ पैशांनी स्वस्त. किंमत ८९.६६ रुपये स्वस्त
एसएमएसवर जाणून घ्या दर
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.