मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले स्वस्त,राजस्थानमध्ये महागले, पाहा तुमच्या शहरांतील आजचे दर

Petrol Diesel Price Today : महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले स्वस्त,राजस्थानमध्ये महागले, पाहा तुमच्या शहरांतील आजचे दर

Aug 23, 2023 09:33 AM IST

Petrol Diesel price today 23 August 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती ८५ डाॅलर्स प्रति बॅरल्सच्या पातळीखाली ट्रेड करत आहेत. तेल कंपन्यांनी सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel price today 23 August 2023 : दररोज सकाळी सहा वाजता तेल कंपन्यांनी दररोज प्रमाणे पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले आहेत. मात्र त्यात कोणताही बदल झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे. या दरम्यान देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ८५ डाॅलर्स खाली ट्रेड करत आहेत. डब्ल्यूटीआय क्रूडही अंदाजे ८१.२३ डाॅलर्स प्रती बॅरल्सवर आहेत.

महानगरांतील दर

तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशाच्या राजधानीत दिल्लीत पेट्रोल-डिझेल ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

राज्यनिहाय पेट्रोल डिझेलचे दर असे वाढतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टींचा समावेश केल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुमच्या शहरातील दर SMS वर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel