मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel Price Today : खनिज तेल दर वाढीचा चढता क्रम, ‘या’ राज्यात बदलले पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel Price Today : खनिज तेल दर वाढीचा चढता क्रम, ‘या’ राज्यात बदलले पेट्रोल डिझेलचे दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Aug 22, 2023 07:00 AM IST

Petrol Diesel price today 22 August 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किंमती ८५ डाॅलर्स प्रति बॅरल्स पार गेल्या आहेत. तेल कंपन्यांनी सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत.

petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel price today 22 August 2023 : दररोज सकाळी सहा वाजता तेल कंपन्यांनी दररोज प्रमाणे पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले आहेत.जवळपास गेल्या ४५० दिवसांपेक्षा अधिक कालावधीपासून पेट्रोल डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

ट्रेंडिंग न्यूज

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार पाहायला मिळत आहे. या दरम्यान देशातील पेट्रोल डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ८५ डाॅलर्स पातळीदरम्यान वर खाली ट्रेड करत आहे. डब्ल्यूटीआय क्रूडही अंदाजे ८१.२३ डाॅलर्स प्रती बॅरल्सवर आहेत.

महानगरांतील दर

तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशाच्या राजधानीत दिल्लीत पेट्रोल-डिझेल ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

राज्यनिहाय पेट्रोल डिझेलचे दर असे वाढतात.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टींचा समावेश केल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.

तुमच्या शहरातील दर SMS वर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

विभाग