Petrol Diesel price today 21 August 2023 : दररोज सकाळी सहा वाजता तेल कंपन्यांनी दररोज प्रमाणे पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ पाहायला मिळत आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ८५ डाॅलर्सच्या खाली आली होती. डब्ल्यूटीआय क्रूडही अंदाजे ८१.२३ डाॅलर्स प्रती बॅरल्सवर गेल्या आहेत.
दिल्लीत पेट्रोल-डिझेल ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. नवे दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. त्यामुळेच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.