Petrol Diesel price today : गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबईत पेट्रोल १०६ रुपये लीटर पार, घरातून निघण्यापूर्वी येथे दर पाहा
Petrol Diesel price today 19 September 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही घरातून बाहेर पडण्याचा प्लान करत असाल तर पेट्रोल डिझेलचे दर नक्की तपासा. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत.
Petrol Diesel price today 19 September 2023 : गणेश चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही घरातून बाहेर पडण्याचा प्लान करत असाल तर पेट्रोल डिझेलचे दर नक्कीच तपासा. सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे नवे रेट्स जाहीर केले आहेत. आज सर्वात स्वस्त पेट्रोल ७९.७४ प्रति लीटर आहे.
ट्रेंडिंग न्यूज
खनिज तेलाच्या किंमती ९५ डाॅलर्स प्रति बॅरल्स पार होण्याची दाट शक्यता आहे. मुंबईत पेट्रोल १०६.३१ प्रति लीटर्स आहे. तर डिझेल ९४ रुपये २७ पैसे दराने विकले जात आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर विकले जात आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२.६३ रुपये तर डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.
यावर्षी पहिल्यांदाच खनिज तेलाच्या किंमती ९४ डाॅलर्स प्रति बॅरल्सपार पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूड ९४.७६ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर पोहोचल्या आहेत तर डब्ल्यूटीआय क्रूड ९२.४३ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर आहेत. यानंतरही भारतात ४९१ दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.
आजही अनेक राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर आहेत. ओडिशा,राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये डिझेल १०० रुपयांपेक्षा वर आहेत. बिहार, केरळ, महाराष्ट्र,तेलंगणा, सिक्कीम, झारखंड, कर्नाटक, पंजाब, मणिपूर, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश,छत्तीसगड या राज्यांमध्ये पेट्रोल १०० रुपयांच्या वर विकले जात आहे.
तुमचा स्मार्टफोन तुमच्या शहरातील दर
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.
विभाग