मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमतीत घट, पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ

Petrol Diesel price today : खनिज तेलाच्या किंमतीत घट, पेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
May 17, 2023 08:48 AM IST

Petrol Diesel price today 17 May 2023 : गेल्या २४ तासांत कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली असली तरी आजही किरकोळ बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. एनसीआरसह अनेक शहरांमध्ये आज किरकोळ किमती वाढल्या आहेत.

Petrol diesel HT
Petrol diesel HT

Petrol Diesel price today 17 May 2023 : जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नरमल्या असतानाही बुधवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. क्रूड सध्या जागतिक बाजारात ७५ डाॅलर्सच्या आसपास आहे. त्याचवेळी सरकारी तेल कंपन्यांनी बुधवारी जारी केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात बदल केला आहे. आज नोएडा-गाझियाबादसह एनसीआरच्या अनेक शहरांमध्ये तेलाच्या किमती वाढल्या आहेत. नोएडामध्ये आज पेट्रोल ९७ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

सरकारी तेल कंपन्यांच्या म्हणण्यानुसार, गौतम बुद्ध नगर (नोएडा-ग्रेटर नोएडा) येथे आज सकाळी पेट्रोल २४ पैशांनी वाढून ९७ रुपये प्रति लिटर, तर डिझेल २१ पैशांनी वाढून ९०.१४ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. गाझियाबादमध्ये आज पेट्रोल १४ पैशांनी महागले आणि ते ९६.५८ रुपये प्रति लिटरवर पोहोचले, तर डिझेल १३ पैशांनी वाढून ८९.७५ रुपये प्रति लिटरवर पोहोचले. यूपीची राजधानी लखनऊमध्येही पेट्रोल ५ पैशांनी महागले असून ते ९६.६२ रुपयांवर पोहोचले आहे. याशिवाय डिझेलही ५ पैशांनी महागून ८९.८१ रुपये प्रति लिटर झाले आहे.

महानगरातील पेट्रोल डिझेलचे दर

दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर

– मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर

- कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर

- चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर आहे

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग