मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : खनिज तेलाचे दर १५ महिन्यांच्या निचांकीवर, पहा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Petrol Diesel price today : खनिज तेलाचे दर १५ महिन्यांच्या निचांकीवर, पहा आजचे पेट्रोल डिझेलचे दर

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Mar 16, 2023 09:16 AM IST

Petrol Diesel price today 16 March 2023 : १६ मार्चसाठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

petrol Pump HT
petrol Pump HT

Petrol Diesel price today 16 March 2023 : १६ मार्चसाठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाने १५ महिन्यांची नीचांकी पातळी गाठली आहे. मात्र, कच्च्या तेलाच्या आणि ब्रेंटच्या (क्रूड) किमतीत मोठी घसरण झाल्याचा परिणाम देशांतर्गत बाजारपेठेतील पेट्रोल डिझेलच्या किंमतींवर दिसत नाहीये. १६ मार्चसाठी देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशात आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

सकाळी सहा वाजता अपडेट

देशातील तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करतात. सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार मुंबई, दिल्ली, कोलकातासह देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलचे दर जाहीर करण्यात आले आहेत.

देशातील प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलच्या किंमती

देशातील चार प्रमुख महानगरांतील पेट्रोल डिझेलच्या दरातही फारसा बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.७३ रुपये आणि डिझेल ९४.३३ रुपये प्रति लिटर आहे.मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९२.२७ रुपये प्रति लिटर आहे.

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो 9224992249 या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग