Petrol Diesel Price Today : खनिज तेलाच्या किमतीत घसरण, पाहा आजचे पेट्रोल डिझेलचे दर
Petrol Diesel price today 16 August 2023 : सकाळी ६ वाजता तेल उत्पादक कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. खनिज तेलाचे दर ८५ डाॅलर्स प्रति बॅरल्सच्या खाली गेले आहेत.
Petrol Diesel price today 16 August 2023 : तेल कंपन्यांनी दररोज प्रमाणे पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले आहेत.
ट्रेंडिंग न्यूज
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. बेंचमार्क ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ८५ डाॅलर्सच्या खाली आली होती. मंगळवारी व्यापाराच्या शेवटी ते प्रति बॅरल ८४.८९ डाॅलर्सवर बंद झाले होते. WTI क्रूड देखील ८०.९९ डाॅलर्सवर बंद झाले. चीनची आर्थिक आकडेवारी आली आहे. अपेक्षेपेक्षा कमकुवत निकाल आले आहेत.परिणामी, कच्च्या तेलाच्या बाजारपेठेवर याचा वाईट परिणाम झाला आहे.
महानगरांतील दर
दिल्लीत पेट्रोल-डिझेल ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.
तुमच्या शहरातील दर SMS वर
पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.
विभाग