Petrol Diesel price today : IOCL ने जारी केले पेट्रोल डिझेलचे दर, चेक करा तुमच्या शहरातील किंमती
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : IOCL ने जारी केले पेट्रोल डिझेलचे दर, चेक करा तुमच्या शहरातील किंमती

Petrol Diesel price today : IOCL ने जारी केले पेट्रोल डिझेलचे दर, चेक करा तुमच्या शहरातील किंमती

Published Sep 15, 2023 08:57 AM IST

Petrol Diesel price today 15 September 2023 : पेट्रोल डिझेलची किंमत जागतिक पातळीवरील कच्च्या तेलाच्या आधारे ठरवली जाते. मात्र, गेल्या वर्षभरापासून त्यात कोणताही बदल झालेला नाही.

petrol diesel HT
petrol diesel HT

Petrol Diesel price today 15 September 2023 : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आज डब्ल्यूटीआय क्रुडच्या किमतीत ०.६३ टक्क्यांची वाढ झाली असून किंमत ९०.७३ डाॅलर्सवर आहे. आज ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमतीत ०.५० टक्क्यांची झाली असून आज किंमत प्रति बॅरल ९४.१७ डाॅलर्सवर आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारावर ठरवले जातात. यामध्ये कर आणि वाहतूक खर्चाचाही समावेश आहे. यामुळे प्रत्येक राज्यात त्यांची किंमत वेगळी आहे.

दिल्लीत एक लिटर पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लीटर विकले जात आहे. मुंबईत हा दर प्रतिलिटर १०६.३२ रुपये तर डिझेलचा दर ९४.२७ रुपये प्रतिलिटर आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०२.६३ रुपये तर डिझेलचा दर ९४.२४ रुपये प्रतिलिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे.

२२ मे २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तेलाच्या किमतीत शेवटचा बदल २२ मे २०२२ रोजी झाला होता. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आज देखील तेल विपणन कंपन्यांनी नवीन दर अपडेट केले आहे.

तुमचा स्मार्टफोन तुमच्या शहरातील दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

Whats_app_banner