मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel Price Today : लाँग विकेंड्च्या प्लानिंगपूर्वी येथे पाहा आजचे लेटेस्ट पेट्रोल डिझेलचे दर!

Petrol Diesel Price Today : लाँग विकेंड्च्या प्लानिंगपूर्वी येथे पाहा आजचे लेटेस्ट पेट्रोल डिझेलचे दर!

Aug 13, 2023 08:00 AM IST

Petrol Diesel price today 13 August 2023 : दरदिवशीप्रमाणेच आज रविवारी सकाळी ६ वाजता तेल उत्पादक कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशातील प्रमुख महानगरे वगळता अनेक शहरांमध्ये दरात बदल झाला आहे.

petrol diesel price HT
petrol diesel price HT

Petrol Diesel price today 13 August 2023 : रविवारी प्रमुख महानगरे वगळता विविध भागांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये बदल झाला आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. शुक्रवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी डब्ल्यूटीआय क्रूड ०.४७ डाॅलर्सच्या वाढीसह प्रति बॅरल ८६.८१ डाॅलर्सवर विकले जात आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड ०.४७ डाॅलर्सने वाढून प्रति बॅरल ८६.८१ डाॅलर्सवर बंद झाले. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. भारतात दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल डिझेलचे दर अपडेट केले जातात. जून २०१७ पूर्वी दर १५ दिवसांनी किमतीत सुधारणा केली जात होती.

महानगरांतील दर

दिल्लीत पेट्रोल-डिझेल ९६.७२ रुपये आणि ८९.६२ रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. तर मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेल ९४.२७ रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

ट्रेंडिंग न्यूज

या शहरांमध्ये बदलले दर

देशात आज आगरा, पटना, अहमहाबाद, अजमेर, नोएडा, गुरूग्राम,जयपूर या शहरामध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीत बदल झाला आहे.

तुमच्या शहरातील दर SMS वर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel
विभाग