मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Petrol Diesel price today : जून महिन्याचा पहिला दिवस, आजचे पेट्रोल डिझेलचे दर येथे पाहा

Petrol Diesel price today : जून महिन्याचा पहिला दिवस, आजचे पेट्रोल डिझेलचे दर येथे पाहा

Kulkarni Rutuja Sudeep HT Marathi
Jun 01, 2023 08:41 AM IST

Petrol Diesel price today 01 June 2023 : तेल विपणन कंपन्यांनी १ जूनसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. १ जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

petrol diesel price today HT
petrol diesel price today HT

Petrol Diesel price today 01 June 2023 : देशातील तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर करतात. देशातील तेल विपणन कंपन्या (OMCs) त्यांच्या वेबसाइटवर पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती अपडेट करतात. जून महिना सुरू झाला असून गेल्या १ वर्षापासून कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. तेल विपणन कंपन्यांनी १ जूनसाठी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. १ जून रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किंमतींमध्ये घसरण झाली आहे. डब्ल्यूटीआय क्रुड कालच्या तुलनेत अंदाजे ३ डाॅलर्सने घसरुन ६९.५६ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रुड ३.५३ डाॅलर्स घसरुन ७३.५४ डाॅलर्स प्रति बॅरल्सवर आहेत. बिहार, गुजरातमध्ये पेट्रोल डिझेलचे दर घसरले आहेत. तर महाराष्ट्र, यूपीमध्ये किंमतीत वाढ दिसत आहे.

महानगरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमती

नवी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर आहे

मुंबईत पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर आहे

कोलकातामध्ये पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर आहे

चेन्नईमध्ये पेट्रोल १०२.६५ रुपये आणि डिझेल ९४.२५ रुपये प्रति लिटरने विकले जात आहे.

एसएमएसवर जाणून घ्या दर

पेट्रोल आणि डिझेलची किंमत एसएमएसद्वारेही कळू शकते. इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला RSP आणि तुमचा शहर कोड लिहावा लागेल आणि तो ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे, जो तुम्हाला IOCL च्या वेबसाइटवरून मिळेल.

WhatsApp channel

संबंधित बातम्या

विभाग