तातडीने पैशाची गरज निर्माण झाल्यानंतर अनेक जण एकतर पर्सनल लोन घेण्याचा पर्याय निवडतात किंवा मग क्रेडिट कार्डचा वापर करून लोन घेत असतात. मात्र दोन्ही माध्यमातून लोन घेताना संपूर्ण तपशील जाणून घेणे आवश्यक असते. जर तुमच्याकडे एक किंवा अधिक क्रेडिट कार्ड असतील आणि तुम्हाला आर्थिक गरज तातडीने पूर्ण करायची असल्यास दोनपैकी एक पर्याय निवडू शकता. एकतर कर्ज उभे करू शकता किंवा क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट करू शकता. अनेक जण यातील नेमक्या कोणत्या पर्यायाकडे जायचे या द्विधा मनस्थितीत असतात. तुम्हाला जर अल्प काळासाठी लोन घ्यायचे असेल तेव्हा दोन्ही पर्याय चांगले असू शकतात. परंतु दीर्घ काळासाठी लोन घ्यायचे असल्यास ठोस निर्णय घेण्यापूर्वी खालील बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत.
१. व्याजदर : बँकद्वारे पर्सनल लोनवर आकारला जाणारा व्याजदर हा क्रेडिट कार्डसाठी आकारल्या जाणाऱ्या व्याजदरापेक्षा तुलनेने कमी असतो. तुम्हाला पर्सनल लोन वर्षाला कमीत कमी १२ टक्के दराने मिळू शकते, तर क्रेडिट कार्डवर वर्षाला ३६ टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जाते. या दोन स्त्रोतांकडून आकारण्यात येणाऱ्या व्याजदरात मोठी तफावत आहे, हे लक्षात ठेवा.
२. क्रेडिट लिमिट : जेव्हा तुम्ही खर्च भागवण्यासाठी क्रेडिट कार्डचा वापर करता, तुमची क्रेडिट लिमिट कमी होते. म्हणून, आपण आणीबाणीच्या प्रसंगासाठी क्रेडिट लिमिट राखून ठेवली पाहिजे.
3. प्री-अप्रूव्ह्ड ऑफर्स : तुम्ही क्रेडिट कार्डवरून लोन घेण्याचा विचारात असताना बँकेकडून तुम्हाला प्री-अप्रूव्ह्ड लोनची कोणती ऑफर आहे का, ते आधी चेक करा. असल्यास क्रेडिट कार्डवरून लोन घेण्याऐवजी प्री-अप्रूव्ह्ड लोनची ऑफर स्वीकारू शकता.
४. रोख रक्कम काढणे : क्रेडिट कार्डचा वापर सामान्यत: कोणत्याही खरेदीनंतर ऑनलाइन पेमेंट करताना होतो. पकंतु रोखीने किंवा डेबिट कार्डद्वारे पैसे खर्च करण्यासाठी मात्र हातात रोख रकमेची आवश्यकता असते.
जर तुम्ही क्रेडिट कार्डद्वारे कॅश काढण्याचा विचार करत असाल तर ते व्यवहार योग्य नाही. क्रेडिट कार्डद्वारे काढण्यात आलेल्या रोखीवर भरमसाठ व्याज आकारले जाते.
क्रेडिट स्कोअर : जेव्हा तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा जास्त वापर करता तेव्हा तुमच्या सीयूआरचं (Credit Utilisation Ratio) ताळमेळ बिघडतं. तुमचे क्रेडिट युटिलायझेशन रेशोचे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा कमी असणे कधीही चांगले. उदाहरणार्थ, क्रेडिट कार्डवर जेव्हा तुमची क्रेडिट मर्यादा १० लाख रुपये असते, तेव्हा त्यावर ३ लाख रुपयांपर्यंत खरेदी झाल्यास आदर्श सीयूआर मानला जातो. क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना तुम्ही वारंवार क्रेडिट मर्यादा ओलांडल्यास तुमच्या क्रेडिट स्कोअरला त्याचा फटका बसतो.
क्रेडिट कार्डवरून कॅश काढणे : क्रेडिट कार्ड फायनान्सिंग हे सामान्यत: कमी रकमेसाठी (५ ते १० लाख रुपयांपर्यंत) असते. तर पर्सनल लोनमध्ये तुम्हाला मोठ्या रक्कम मिळू शकते.
(टीप: क्रेडिट कार्ड स्वतःच्या जोखीमेवर वापरावे)
संबंधित बातम्या