एका वर्षात ‘या’ चिटुकल्या शेअरनं मिळवून दिला तब्बल ६०० टक्के नफा; भाव २० रुपयांपेक्षाही कमी
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  एका वर्षात ‘या’ चिटुकल्या शेअरनं मिळवून दिला तब्बल ६०० टक्के नफा; भाव २० रुपयांपेक्षाही कमी

एका वर्षात ‘या’ चिटुकल्या शेअरनं मिळवून दिला तब्बल ६०० टक्के नफा; भाव २० रुपयांपेक्षाही कमी

Dec 10, 2024 04:13 PM IST

CNI Research Share Price : सीएनआय रिसर्च या छोट्या कंपनीच्या छोट्या शेअरनं एका वर्षात गुंतवणूकदारांना अक्षरश: मालामाल करून टाकलं आहे.

एका वर्षात ‘या’ चिटुकल्या शेअरनं मिळवून दिला तब्बल ६०० टक्के नफा, भाव २० रुपयांपेक्षाही कमी
एका वर्षात ‘या’ चिटुकल्या शेअरनं मिळवून दिला तब्बल ६०० टक्के नफा, भाव २० रुपयांपेक्षाही कमी

Penny Stock News Marathi : पुरेसा अभ्यास आणि संयम ही शेअर बाजारातील यशाची गुरुकिल्ली आहे. या किल्लीचं मोल एकदा कळलं की स्वस्तातला शेअर देखील चांदी करून जातो. सीएनआय रिसर्चनं शेअरनं याची प्रचिती दिली आहे.

सीएनआय रिसर्च या शेअरनं गुंतवणूकदारांना मागच्या चार वर्षांत ८०० टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे. चार वर्षांपूर्वी या पेनी स्टॉकची किंमत फक्त १.८० रुपये होती. आता हा शेअर १७.२८ रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या ४ वर्षात कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत ८६० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, एका वर्षात या शेअरनं ६०० टक्क्यांहून अधिक नफा मिळवून दिला आहे.

२०२४ मध्ये सीएनआय रिसर्चच्या शेअर्समध्ये एनएसईवर ६२० टक्के वाढ झाली आहे. तर, गेल्या वर्षभरात या पेनी शेअरनं पोझिशनल गुंतवणूकदारांना ६५४ टक्के परतावा दिला आहे. मंगळवारी कंपनीचा शेअर १७.१९ रुपयांवर खुला झाला. पण काही काळानंतर कंपनीच्या शेअर्सला अप्पर सर्किट लागलं. सीएनआय रिसर्चच्या शेअरमध्ये आज ५ टक्क्यांची वाढ दिसून आली. कंपनीनं आज १७.२८ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचण्यात यश मिळवलं आहे. या पेनी स्टॉकची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी २.१४ रुपये आहे.

आज दोनदा लागलं अप्पर सर्किट

आज कंपनीच्या शेअर्सनी दोनवेळा अप्पर सर्किटला धडक दिली. यापूर्वी ९ डिसेंबर रोजी कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागलं होतं. गेल्या ६ ट्रेडिंग सेशनपासून कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये आहेत. कंपनीचं मार्केट कॅप १९८.३८ कोटी रुपये आहे.

सप्टेंबर तिमाहीत कंपनीची कामगिरी कशी होती?

चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कंपनीला तोटा सहन करावा लागला. दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ३.१६ कोटी रुपयांचा तोटा झाला. तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला १६ कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीसाठी चिंतेची बाब म्हणजे सप्टेंबर तिमाहीत अवघी ३३ लाखांची विक्री झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत २५६ लाख रुपयांची विक्री झाली होती.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner