Penny Stock : अवघ्या २२ दिवसांत पैसे दुप्पट! शेअरची किंमत बघाल तर तुम्हालाही खरेदीचा मोह होईल!
मराठी बातम्या  /  बिझनेस  /  Penny Stock : अवघ्या २२ दिवसांत पैसे दुप्पट! शेअरची किंमत बघाल तर तुम्हालाही खरेदीचा मोह होईल!

Penny Stock : अवघ्या २२ दिवसांत पैसे दुप्पट! शेअरची किंमत बघाल तर तुम्हालाही खरेदीचा मोह होईल!

Jan 09, 2025 03:21 PM IST

Yuvraaj Hygiene Products share Price : युवराज हायजीन प्रॉडक्डट्स या कंपनीच्या शेअरनं गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. अवघ्या २२ दिवसांत या शेअरनं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

Penny Stock : अवघ्या २२ दिवसांत पैसे दुप्पट! शेअरची किंमत बघाल तर तुम्हालाही खरेदीचा मोह होईल!
Penny Stock : अवघ्या २२ दिवसांत पैसे दुप्पट! शेअरची किंमत बघाल तर तुम्हालाही खरेदीचा मोह होईल!

Penny Stock News in Marathi : युवराज हायजीन प्रॉडक्ट्स हा चिमुकला शेअर गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात जोरदार चर्चेत आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना दमदार परतावा देणारा हा शेअर मल्टीबॅगर म्हणून उदयास आला आहे. अवघ्या २२ दिवसांत शेअरनं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

यंदा सलग सात सत्रात या शेअरला अप्पर सर्किट लागलं आहे. या कालावधी त्यात २५ टक्के वाढ दिसून आली. युवराज हायजीन प्रॉडक्ट्सच्या शेअरनं गुरुवारी २ टक्क्यांचा उच्चांक गाठला आणि इंट्राडे ५.७० रुपयांचा उच्चांक गाठला.

डिसेंबर २०२० मध्ये हा शेअर ७२ पैसे प्रति शेअर दरानं व्यवहार करत होता. म्हणजेच आजच्या भावानुसार या शेअरनं आतापर्यंत ७०० टक्क्यांपर्यंत दमदार परतावा दिला आहे. अल्पावधीतही युवराज हायजीन प्रॉडक्ट्सनं (Yuvraaj Hygiene Products) परतावा दिला आहे.

वर्षभरात २८५ टक्क्यांची वाढ 

गेल्या वर्षभरात मल्टीबॅगर शेअरमध्ये २८५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान, १ जानेवारी २०२४ रोजी १.४० रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी स्तरावरून तो २०७ टक्क्यांनी वधारला आहे. सहा महिन्यांत त्यात २०६ टक्के, तर एका महिन्यात १६६ टक्के वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात ९ डिसेंबर रोजी शेअरचा भाव २.१४ रुपये होता.

सप्टेंबर तिमाहीचे निकाल

आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत युवराज हायजिन प्रॉडक्ट्सचे निकाल चांगले आले आहेत. सप्टेंबर २०२४ तिमाहीत कंपनीला १.३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला ०.१० कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला होता. कंपनीच्या एकूण उत्पन्नातही प्रचंड वाढ झाली असून, ती आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीतील ४.९८ कोटी रुपयांवरून आर्थिक वर्ष २०२४ च्या दुसऱ्या तिमाहीत ११.०४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

काय आहे कंपनीचा व्यवसाय?

युवराज हायजीन प्रॉडक्ट्स ही भारतातील सफाई उत्पादनं आणि उपकरणांची आघाडीची उत्पादक आणि पुरवठादार आहे. कंपनीकडं वैविध्यपूर्ण उत्पादन पोर्टफोलिओ आहे. यात वैयक्तिक स्वच्छता स्क्रब पॅड, टॉयलेट ब्रश, फ्लोअर वायपर, कॉटन मोप्स, पीव्हीए मोप्स, स्क्रबर, क्लीनिंग ब्रश, प्लँजर आणि बॉडी स्क्रबर यांचा समावेश आहे. ही उत्पादनं HIC ब्रँड नावानं विकली जातात आणि घरगुती आणि व्यावसायिक स्वच्छतेच्या गरजा पूर्ण करतात.

 

(डिस्क्लेमर: हे वृत्त केवळ माहितीपर आहे. तज्ज्ञांची मतं, सूचना व शिफारशी त्यांच्या वैयक्तिक आहेत. हिंदुस्तान टाइम्स मराठी कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा सल्ला देत नाही. त्यामुळं गुंतवणूक करण्याआधी आर्थिक सल्लागाराशी चर्चा करा.)

Whats_app_banner