Penny Stock Marathi News : भारतीय शेअर बाजारात सेनेक्स आणि निफ्टीची आज मोठी पडझड सुरू असताना काही पेनी शेअर्स रॉकेटच्या वेगानं वाढत आहेत. युनिक मॅनेजिंग अॅडव्हायझर्स लिमिटेड हा यापैकीच एक शेअर आहे. या पेनी शेअरच्या भावानं मंगळवारी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.
युनिक मॅनेजिंग अॅडव्हायझर्स लिमिटेडचा शेअर सोमवारी १७.५५ रुपयांवर बंद झाला. तर, मंगळवारी व्यवहारादरम्यान हा शेअर २०.९० रुपयांवर पोहोचला. आदल्या दिवसाच्या तुलनेत या शेअरमध्ये जवळपास २० टक्क्यांची वाढ झाली. शेअरचा हा ५२ आठवड्यांतील उच्चांक आहे. शेअरचा ५२ आठवड्यांचा नीचांक ८.७५ रुपये आहे.
युनिक मॅनेजिंग अॅडव्हायझर्स लिमिटेडच्या शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल जाणून घेणं महत्त्वाचं आहे. कंपनीच्या प्रवर्तकांकडं २२.४६ टक्के हिस्सा आहे. हा हिस्सा इम्पीरियल कन्सल्टंट्स अँड सिक्युरिटीज लिमिटेड या प्रवर्तकाकडं आहे. तर, सार्वजनिक भागधारकांकडं कंपनीचे ७७.५४ टक्के शेअर्स आहेत. हर्ष हितेश झवेरी हे कंपनीचे सर्वात मोठे भागधारक आहेत. झवेरी यांचा कंपनीत ७.९१ टक्के हिस्सा आहे.
युनिक मॅनेजिंग अॅडव्हायझर्स लिमिटेड ही एक पब्लिक लिमिटेड कंपनी आहे. ही कंपनी स्टार्ट-अप सल्लामसलत आणि धोरणात्मक सल्लागार म्हणून सेवा देते. पूर्वी ही कंपनी एस्सार सिक्युरिटीज लिमिटेड या नावानं ओळखली जात होती. कंपनीचे समभाग ३० डिसेंबर २००९ पासून मुंबई शेअर बाजारात (BSE) सूचीबद्ध आहेत.
संबंधित बातम्या